ETV Bharat / state

नंदुरबारमध्ये 13 नवे कोरोना रुग्ण; बाधितांची संख्या 260 वर - नंदुरबार कोरोना केसेस

नंदुरबारमध्ये रविवारी 13 कोरोना रुग्ण वाढले. यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 260 वर पोहोचली आहे.

Nandurbar corona update
नंदुरबार कोरोना अपडेट
author img

By

Published : Jul 13, 2020, 9:37 AM IST

नंदुरबार- कोरोना रोखण्यासाठी रविवारी नंदुरबारमध्ये कडक संचारबंदीचे पालन करण्यात आले. मात्र, दिवसभरात 13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरवासियांची चिंता वाढली आहे. नंदुरबार शहरात तब्बल 10 तर शहाद्यात तिघांना कोरोनाची लागण झाली आहे.

नंदुरबारातील एकाचा अहवाल मृत्यूच्या दोन दिवसानंतर पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे मृतांची संख्या 11 झाली आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा 260 वर पोहोचला आहे. तसेच तीन जण संसर्गमुक्त झाल्याने 151 जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.

नंदुरबार शहरासह जिल्ह्यात जून महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. जिल्ह्यातील नंदुरबार शहर व तालुक्यात कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण आहेत. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नंदुरबार शहरात प्रत्येक रविवारी कडक संचारबंदी जारी केली आहे.

रविवारी वाढलेल्या रुग्णांमध्ये नंदुरबारमध्ये 10 जणांना तर शहाद्यात तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. यात नंदुरबार शहरातील मोठा मारुती मंदिर परिसरात 36 वर्षीय पुरुष, देसाईपुरा भागातील 70 वर्षीय वृध्द महिला, 45 वर्षीय पुरुष, 37 वर्षीय महिला, 28 वर्षीय युवक व एकता नगरातील 42 वर्षीय महिला, रायसिंगपुरा भागात 22 वर्षीय युवक, चौधरी गल्लीत 85 वर्षीय वृध्द, आंबेडकर चौकातील 75 वर्षीय मयत पुरुष व नंदुरबारात एका 36 वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे.

शहाद्यात डोंगरगांव रोड भागात 60 वर्षीय पुरुष, 29 वर्षीय महिला, शंकरविहारात 39 वर्षीय पुरुष, अशा एकूण 13 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

नंदुरबार येथील आंबेडकर चौकातील 70 वर्षीय रुग्णाचा 10 जुलैला मृत्यू झाला होता. मात्र, मृत्यूनंतर दोन दिवसांनी काल त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा अकरावा बळी गेला आहे.

दरम्यान, सकाळी आलेल्या अहवालात तीन जण संसर्गमुक्त झाले आहेत. यामध्ये नंदुरबार तालुक्यातील भोणे येथील 1 व्यक्ती, नवापूर येथील मंगळदास पार्कमधील 1 व्यक्ती व नंदुरबार येथील देसाईपुरा भागातील 1 व्यक्ती या तिघांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 260 वर असून त्यापैकी 149 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 11 जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित 90 रुग्ण जिल्हा रूग्णालयात उपचार घेत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.