ETV Bharat / state

आफ्रिकेतील सर्वोच्च शिखरावर फडकला तिरंगा; अनिल वसावेंनी केला विश्वविक्रम - Indian Constitution Kilimanjaro Peak

26 जानेवारी रोजी सकाळी 11.15 वाजता नंदुरबार येथील अनिल वसावे यांनी किलीमांजारो शिखरावर भारताच्या संविधानाची प्रस्तावना वाचून व भारताचा सर्वात मोठा तिरंगा फडकावून विश्वविक्रम केला.

Anil Vasave news Kilimanjaro
अनिल वसावे विश्वविक्रम
author img

By

Published : Jan 27, 2021, 10:17 PM IST

Updated : Jan 28, 2021, 3:37 PM IST

नंदुरबार - टांझानिया (आफ्रिका) येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त 360 एक्सप्लोर ग्रुपद्वारे आफ्रिकेतील सर्वोच्च शिखराच्या मोहिमेत महाराष्ट्राच्या युवकाने इतिहास घडवत देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली. 26 जानेवारी रोजी सकाळी 11.15 वाजता नंदुरबार येथील अनिल वसावे यांनी किलीमांजारो शिखरावर भारताच्या संविधानाची प्रस्तावना वाचून व भारताचा सर्वात मोठा तिरंगा फडकावून विश्वविक्रम केला.

आफ्रिकेतील सर्वोच्च शिखरावर फडकला तिरंगा

दुर्गम भागातील युवकांनी केला विश्वविक्रम

आफ्रिकेतील टांझानिया देशातील हे शिखर असून याची उंची समुद्र सपाटीपासून 19 हजार 341 फूट आहे. अतिशय खराब वातावरणात शून्याच्या खाली तापमान, गोंगावत वाहणारे वारे, उभी चढण, पडणारा बर्फ या सर्वांमधून अतिशय काळजीपूर्वक यांनी ही मोहीम पूर्ण केली. या शिखराच्या चढाईसाठी त्यांनी 19 जानेवारी रोजी सुरुवात केली होती. असा आगळावेगळा व देशाला अभिमानास्पद विक्रम केल्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

जगाला दिला शांततेचा संदेश

भारतीय घटनेतील स्वातंत्र, समता, बंधुता, एकात्मता या तत्वांचा प्रचार जगभर यामार्फत होणार आहे. जगाला शांततेचा संदेश जावा यासाठी हा प्रवास केल्याचे म्हटले जात आहे. गेली अनेक वर्षे शारीरिक कसरती व वेगवेगळे गिर्यारोहण करत अनिल यांनी तयारी केली.

ऑस्ट्रेलिया खंडातील सर्वोच्च शिखर चढाई करणार

आफ्रिकेतील टांझानिया येथील यशस्वी चढाई झाल्यानंतर येत्या काळात अनिल वसावे 360 एक्स्प्लोररच्या माध्यमातून युरोप व ऑस्ट्रेलिया खंडातील सर्वोच्च शिखर सर करणार आहेत. अशी माहिती अनिल वसावे (गिर्यारोहक, नंदुरबार) यांनी दिली. आमच्या प्रत्येक पावलावर एक मोठे साहस होते. आफ्रिकेतील हे शिखर सर करणे माझ्या कुटुंबासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आई-वडिलांचा आशीर्वाद, मित्रांची व अनेक बड्या मंडळींनी साथ दिल्यामुळे माझे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले. एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प ऑफिस तळोदा, आदिवासी शिक्षक संघ नंदुरबार, जैन इरीगेशन जळगाव यांनी सहकार्य केले आहे.

हेही वाचा - शाळांना भेट देत नंदुरबारमध्ये शिक्षणाधिकार्‍यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

आनंद बनसोडे (सीईओ, 360 एक्स्प्लोरर) यांनी जे यश संपादन केले आहे त्याचा सर्वांना अभिमान आहे. संविधान वाचून संपूर्ण भारतीयांना अभिमान वाटेल अशी कामगिरी त्यांनी केली आहे. अतिशय प्रतिकूल वातावरणात त्यांनी जी चढाई केली, त्याला कशाची तोड नाही. 360 एक्स्प्लोररच्या माध्यमातून अनेकांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे वसावे म्हणाले.

पालकमंत्र्यांकडून अनिल वसावे यांना आर्थिक मदत

एव्हरेस्टवीर आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आंनद बनसोडे यांच्या टिमसोबत आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर किलीमांजरो या शिखरावर 360 एक्स्प्लोररच्यावतीने चढाई करण्याकरिता अक्कलकुवा तालुक्यातील बालाघाटच्या अनिल वसावेची निवड झाल्याने त्याला पुढील तयारीसाठी राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अ‌ॅड.के.सी. पाडवी यांच्या हस्ते 3 लाख रुपयांचा धनादेश देऊन प्रोत्साहन देण्यात आले होते.

अतिदुर्गम भागात राहणाऱ्या अनिलला गरीब परिस्थितीमुळे मोहिमेवर जाणे शक्य नव्हते. ही बाब पालकमंत्री पाडवी यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने अनिल यांना मदत दिली. प्रकल्प कार्यालयातर्फे न्यूक्लिअस बजेट योजनेंतर्गत तात्काळ कार्यवाही करण्यात आली व पुढील मोहिमेसाठी आवश्यक मदत अनिलला देण्यात आली. आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर किलीमांजरो चढाई करण्याकरिता विविध स्पर्धांमधून 10 गिर्यारोहकांची निवड करण्यात आली आहे.

हेही वाचा - नंदुरबार : मजुरांना घेऊन जाणारी जीप दरीत कोसळली, ६ जागीच ठार

Last Updated : Jan 28, 2021, 3:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.