ETV Bharat / state

Nandurbar Rains Update : विसरवाडी पूर्व पट्ट्यात मुसळधार पाऊसामुळे सरपणी नदीला पुर; जनजीवन विस्‍कळीत - Nandurbar Flood

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाची संततधार सुरूच आहे (Nandurbar Rains Update). दरम्‍यान नवापूर तालुक्यातील खांडबारा आणि विसरवाडी (Khandbara and Visarwadi) पूर्व पट्ट्यातील गावांमध्ये सकाळपासून मुसळधार पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. यामुळे नदी नाल्यांना महापूर आला आहे. शेतांमध्येही पाणीच पाणी झाले असून विसरवाडी पूल पाण्याखाली गेल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

Nandurbar
नंदुरबार
author img

By

Published : Jul 11, 2022, 12:39 PM IST

नंदुरबार - ( Nandurbar Flood ) सरपणी नदीला आलेल्या पुरामुळे ( Sarpani river floods ) विसरवाडी जवळ नदीचे पाणी पुलावरुन वाहत असल्याने सुरत- अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 06 वरची वाहतुक ठप्प झाली आहे. नवापुर तालुक्यात दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असुन यामुळे विसरवाडी परिसरातील नेसु, सरपणी आणि नागण नद्यांना पुर आला आहे. सकाळी आठच्या सुमारास विसरवाडीच्या पुलावरुन पाणी जावु लागल्याने पोलीसांनी या महामार्गावरची वाहतुक बंद केली होती. नंतर सुरत कडुन येणारी वाहने नंदुरबार मार्गे तर धुळ्याकडुन येणारी वाहने दहीवद मार्ग वळविण्यात आली आहे. दरम्यान पुलावरुन पाणी गेल्यानंतर पाच किलोमीटर पर्यत वाहनाच्या रांगा लागलेल्या पहावयास मिळाल्या.

अभियंत्यांची बघायची भूमिका- राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे(National Highway ) पुलाचे काम संथगतीने सुरू असल्याने नागरिकांना व वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या ठिकाणी आलेले अभियंत्यांनी उपायोजना न करता बघायची भूमिका घेतली.नवीन पूल होत नाही तोपर्यंत जुना पूल तोडायला नको होता. आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली आहे. महामार्ग चौपदरीकरणाऱ्या ठेकेदाराचा नियोजन शून्य कारभारावर नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहे.यासंदर्भात वरिष्ठ अधिकारी लक्ष देऊन संबंधित ठेकेदाराला ताकीद देण्याची गरज आहे.

नंदुरबार पूर

पर्यायी रस्ता मार्गाचा वापर- विसरवाडी गावाजवळील पुलावरून पाणी वाहत असल्याने रस्ता बंद झाल्याची माहिती वाहन चालकांना मिळतात त्यांनी आपला मार्गात बदल केला आहे. सुरत ऊन येणारे वाहन नवापूर उचल मार्गे नंदुरबार धुळ्याकडे जात आहेत तर धुळ्याहून येणारे वाहन देखील याच मार्गाने जात असल्याचे चित्र दिसून आले. महामार्गावरील पूल पाण्याखाली गेल्याने पर्यायी मार्ग साक्री तालुक्यातील शेवाळी, नंदुरबार ते निझर, उच्छल,गांधीनगर असा मार्ग देण्यात येणार आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी दिली.

नदी काठावरील गावांना सतर्कतेच्या इशारा- नवापूर तालुक्यात लगातार दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने पूर्व भागातील पानबारा, सोनखांब, मोरकरंजा, तिळासर, जामनपाडा आदी भागातील शेती पाण्याखाली गेली आहे. शेतकऱ्यांचे देखील नुकसान होत आहे. विसरवाडी ग्रामपंचायत अंतर्गत तीन विहिरी नदीकिनारी असून त्या पाण्याखाली गेल्याने विसरवाडीतील पाणीपुरवठ्यावर याचा परिणाम होऊ शकतो.नदीकिनारी असलेल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा : Monsoon : मुंबईसह या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी, हवामान खात्याचा अंदाज

हेही वाचा : Bike Stunt: पुलावर दुचाकीचा स्टंट करणे तरूणास पडले महागात

हेही वाचा : Bjapur Rain - बीजापूरमध्ये मुसळधार पाऊस! काही ठिकाणी ट्रक गेल्या वाहून

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.