ETV Bharat / state

नवीन कोरोनाबाधितांचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित; निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया सुरू - तळोदा कोरोना रूग्ण

तळोदा शहरात एका कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात आल्याने सात जणांना कोरोनाची लागण झाली आहे. नव्याने सापडलेल्या सात कोरोनाबाधितांमध्ये मोठा माळीवाड्यातील पाच, शिवराम नगर आणि काकाशेठ गल्लीतील एका रुग्णाचा समावेश आहे. प्रशासनाने हे रूग्ण राहत असलेला परिसर तत्काळ प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे.

Taloda
तळोदा
author img

By

Published : Jun 20, 2020, 4:17 PM IST

नंदुरबार - तळोदा शहरात ठाण्याहून आलेल्या 72 वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या 40 वर्षीय मुलाचा देखील अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्याच्या संपर्कातील 13 जणांना क्वॉरंटाईन करून तपासणी केली असता आणखी सातजण पॉझिटिव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली. त्यामुळे प्रशासनाने हे रूग्ण राहत असलेला परिसर तत्काळ प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे.

नवीन कोरोनाबाधितांचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित

नव्याने सापडलेल्या सात कोरोनाबाधितांमध्ये मोठा माळीवाड्यातील पाच, शिवराम नगर आणि काकाशेठ गल्लीतील एका रुग्णाचा समावेश आहे. या बाधितांच्या संपर्कातील आणखी 17 जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. सहायक जिल्हाधिकारी अविशांत पंडा, तहसिलदार पंकज लोखंडे, पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे, मुख्याधिकारी सपना वसावा, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण, नायब तहसिलदार शैलेष गवते, श्रीकांत लोमटे, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर पाकळे यांनी बाधितांच्या वास्तव्य परिसराला भेट देवून पाहणी केली.

सध्या या परिसरांमध्ये नगरपालिकेतर्फे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. आरोग्य विभागाकडून सर्व नागरिकांची तपासणी मोहिम हाती घेण्यात आली आहे. प्रशासनाने आणखी खबरदारी घेत शहरातील लॉकडाऊन 23 जूनपर्यंत वाढवला आहे. यात दवाखाने, मेडीकल, भाजीपाला, किराणा दुकाने या अत्यावश्यक सेवा सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर दुध विक्रीला सकाळी 7 ते 9 व सायंकाळी 5 ते 7 यावेळेत घरपोच सेवा देण्याच्या अटीवर मुभा देण्यात आली आहे. सहायक जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी याबाबत आदेश दिले आहेत.

ठाणे येथून आलेल्या महिलेच्या संपर्कातील व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याच महिलेच्या अंत्यविधीला उपस्थित असणार्‍या एका व्यक्तीचा नव्या बाधितांमध्ये समावेश आहे. तर या कुटुंबातील व्यक्तींनी एका लग्नात हजेरी लावल्याचीही चर्चा सुरू आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. मात्र, दगावलेल्या महिलेवर उपचार करणार्‍या डॉक्टरांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

दरम्यान, नागरिकांना आरोग्य विषयक कुठलीही तक्रार असल्यास त्वरित आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. नागरिकांनी अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.