ETV Bharat / state

कोरोना चाचणी करण्यासाठी गेलेल्या शिक्षकाला वाळूच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू

शिक्षकाला भरधाव वेगाने आलेल्या वाळूच्या डंरपने चिरडल्याची घटना घडली. संबधित शिक्षक कोरोना चाचणी करून तळोदा येथे परतत होते. राजेंद्र मधुकर पाटील (40) असे मयत शिक्षकाचे नाव असून ते तळोदा येथील श्रीराम नगरातील रहिवासी होते.

नंदूरबार न्यूज
नंदूरबार न्यूज
author img

By

Published : Nov 20, 2020, 7:10 PM IST

नंदुरबार - शिक्षण विभागातील अधिकारी आणि शिक्षकांना कोरोना चाचणी करण्याचे अनिवार्य केल्याने शिक्षकांची एकच धावपळ उडाली आहे. कोरोना चाचणी करून तळोदा येथे परतणार्‍या शिक्षकाला भरधाव वेगाने आलेल्या वाळूच्या डंरपने चिरडल्याची घटना घडली. यात शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना डामरखेडा गावाजवळ घडली आहे. याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोना चाचणी करण्यासाठी शिंदखेडा तालुक्यातील चिमठावळ येथून तळोदा येथे परतणार्‍या शिक्षकाचा डामरखेड्याजवळ अपघातात मृत्यू झाला. डामरखेडा पुलाजवळील खराब रस्त्यात दुचाकी अचानक घसरून शिक्षक खाली पडल्यानंतर मागून येणार्‍या वाळूच्या डंपरने त्यांना चिरडले. गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास हा गंभीर अपघात घडला. राजेंद्र मधुकर पाटील (40) असे मयत शिक्षकाचे नाव असून ते तळोदा येथील श्रीराम नगरातील रहिवासी होते.

राजेंद्र पाटील हे धडगाव तालुक्यातील पाडामुंड येथील आश्रमशाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. दिवाळीनिमित्त ते शिंदखेडा येथील चिमठावळ गावी गेले होते. गुरुवारी तेथून (एमएच 18 बीएस 6948) दुचाकीने परत येत असताना गोमाई नदीच्या पुलाजवळ त्यांची दुचाकी अचानक घसरल्याने राजेंद्र पाटील रस्त्यावर पडले. दरम्यान मागून (एमएच 26 बीई 1869) हा ट्रक आला. ट्रकच्या मागच्या चाकात आल्याने शिक्षक राजेंद्र पाटील हे अक्षरश: चिरडले जावून त्यांचा मृत्यू झाला.

म्हसावद येथे शवविच्छेदन -

प्रकाशा पोलीस दूरक्षेत्राचे कर्मचाऱ्यांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी प्रकाशा ग्रामीण रुग्णालयात पाठवला. परंतू तेथे वैद्यकीय अधिकारी नसल्याने त्यांचा मृतदेह म्हसावद येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला. रात्री उशिरा मयत राजेंद्र पाटील यांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी डंपर चालकाविरुध्द शहादा पोलीस ठाण्यात भादवी कलम 304 (अ),279, 337, 338, 184 गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मूळगाव चिमठावळ येथे अंत्यविधी -

मयत राजेंद्र पाटील यांच्यावर त्यांच्या मूळ गावी चिमठावळ येथे अंत्यविधी करण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.