नंदुरबार - कोरोनामुळे देशात लॉकडॉऊन लागल्याने अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. अनेकांना आपला व्यापार, व्यवसाय सोडावा लागला. लॉकडॉऊनमुळे नागरिकांना जीवनावश्यक वस्तू ज्यादा किंमतीने खरेदी कराव्या लागत होत्या. नागरिकांच्या गैरसोयी होऊ लागल्या होत्या. याबाबी लक्षात घेत शहादा तालुक्यातील म्हसावद येथील रेखा पटेल यांनी परिसरातील भगिनींना सोबत घेऊन बचत गटच्या माध्यमातून किराणामाल व्हाट्सअप ग्रुप द्वारे घरपोच द्यावा, तोही योग्य तो बाजार भावतच. यामुळे नागरिकांची गैरसोय थांबविण्यात महिलांना यश आले. स्वामिनी महिला बचत गटाच्या ( Swamini Bachat Group Nandurbar ) माध्यमातून विक्री होणाऱ्या किराणामाल नागरिकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला व तो अद्यापही त्यांनी चांगल्यारित्या सुरूच ठेवला.
![Swamini Bachat Group Nandurbar](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-ndb-womens-day-special-mh10020_08032022082050_0803f_1646707850_107.jpg)
"स्वामिनी बचत गट" स्थापन करून महिलांना केले स्वयंपूर्ण - कोरोना काळात अनेकांचा रोजगार गेला. मात्र, काहींनी या संधीचे सोने केले. शहादा तालुक्यातील म्हसावद येथील आठ महिलांनी एकत्र येऊन "स्वामिनी बचत गट" स्थापन केला. त्यात त्यांनी स्वतःचे भाग भांडवल टाकले आणि व्यवसायाला सुरुवात केली. या दोन वर्षात त्यांनी व्यवसायातून दर महिन्याला हजारोंचा नफा मिळू लागला. कोरोना काळात परिसरातील सात ते आठ महिलांना रेखा पटेल यांनी एकत्र केले आणि किराणा माल आणि मसल्याचा व्यवसाय सुरू केला.
वाजवी दरात व घरपोच किराणा मालाला नागरिकांचा प्रतिसाद - किराणा मालाचे बाजार भाव वाढलेला असतांना त्यांनी वाजवी दरात घरपोच किराणा पोचवण्यास सुरुवात केली. त्यामुळे महिला बचत गटाला चांगला प्रतिसाद मिळत गेला. बचत गटातील महिन्यांला तीन ते चार लाख रुपयांची उलाढाल होऊ लागली आणि ती वाढत गेली. आता किराणा आणि मसाला विक्रीतून त्यांना हजारो रुपयांचा नफा होत आहे.
व्हाट्सअपच्या माध्यमातून मिळाली चालना - महिला बचत गटातील सदस्यांनी सोशल मीडिया आता आधार घेत "स्वामिनी बचत गट" नावाने व्हाट्सअप ग्रुप स्थापन केला. या ग्रुप वर महिला आपल्याजवळ असलेल्या किराणामाल व त्याचा भाव त्याच बरोबर मसाल्यातील पदार्थ व त्यांचा भाव असे ग्रुप वर शेअर करीत गेल्या. त्या ग्रुप सर्वच महिलांना मिळालेल्या ऑर्डर्स बचत गटातील महिलांनी पूर्ण केल्या व त्यास चांगला प्रतिसाद मिळत गेला. बचत गटातील महिलांनी आम्ही आधुनिक भारतातील महिला आहोत हे दाखवून दिले.
बचत गटाच्या माध्यमातून महिलांचा आत्मविश्वास वाढला - बचत गट सुरू केला त्यातून बचत गटातील महिलांची प्रगती झाली. आम्हला नवीन संधी उपलब्ध करून दिल्याने आता आत्मविश्वास वाढल्याचे बचत गटातील सदस्य सीमा पाटील यांनी सांगितले. कोरोना काळात अनेक बेरोजगार झालेत मात्र या महिलांनी आपल्या व्यवसायाची गाडी रुळावर आणली संधीचे सोने करून घेतले.
हेही वाचा - Maharashtrian Family Suicide : महाराष्ट्रीयन कुटुंबाची भुवनेश्वरमध्ये गळफास घेत आत्महत्या