ETV Bharat / state

नंदुरबार : बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकीला अचानक आग; डिक्कीतले पैसेही जळून खाक - नंदुरबार ताज्या बातम्या

शहादा शहरात बॅटरीवर चालणाऱ्या चालत्या दुचाकी वाहनात अचानक वायरिंग स्पार्किंग झाल्यामुळे नवी दुचाकी जळून खाक झाली आहे. यात दुचाकी चालकाच्या वाहनाच्या डिक्कीत एक लाख रुपये रोख रक्कमेसह वाहनाची किंमत 72 हजार रूपये असे नुकसान झाले आहे.

नंदुरबार
नंदुरबार
author img

By

Published : Oct 29, 2021, 2:14 PM IST

नंदुरबार - गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. त्या अनुषंगाने इलेक्ट्रिक बाइक व बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकींना नागरिकांनी चांगलीच पसंती दिली आहे. मात्र, शहादा शहरात बॅटरीवर चालणाऱ्या चालत्या दुचाकी वाहनात अचानक वायरिंग स्पार्किंग झाल्यामुळे नवी दुचाकी जळून खाक झाली आहे. यात दुचाकी चालकाच्या वाहनाच्या डिक्कीत एक लाख रुपये रोख रक्कमेसह वाहनाची किंमत 72 हजार रूपये असे नुकसान झाले आहे.

प्रतिक्रिया

बॅटरीवर चालणाऱ्या वाहनाला पसंदी -

पेट्रोलचे दर केल्यानंतर नागरिकांनी इलेक्ट्रिक बाइक व बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांना चांगलीच पसंती दिली आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक व बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकींची विक्री झाली आहे. मात्र अशा घटना घडल्यामुळे इलेक्ट्रिक बॅटरी पालकांच्या मनात भीती निर्माण होत आहे. पेट्रोल चालणाऱ्या वाहनाला पर्याय म्हणून अनेक दुचाकी वाहन चालक आता बॅटरीवर चालणाऱ्या वाहनाला पर्याय म्हणून खरेदी करीत आहेत.

दुचाकी चालकाचे नुकसान -

शहराला शहरातील मेमन कॉलनीतील जुनेद आणि मेमन यांनी तीन महिन्यापूर्वी बॅटरीवर चालणारी सुमारे 72 हजार रुपये खर्चाची वाहन गेल्या तीन महिन्यापूर्वी खरेदी केलेली होती. जुनेद मेमन यांच्या सोडा बाटली व पाण्याच्या व्यवस्था असल्याने शहरात वसाहतीत ग्राहकांची संपर्क करण्यासाठी बॅटरीवर चालणारी दुचाकी मोटरसायकल ही सोपस्कर झाली होती. पेट्रोलचा खर्च अवक्या बाहेर जात असतांना बॅटरीवर चालणारी मोटर सायकलमुळे पेट्रोलचा खर्च वाचू लागला होता. सायंकाळी चार साडेचार वाजेच्या दरम्यान जुनेद मेमन बॅटरीवर चालणारी मोटर सायकल व त्या डिक्कीत सुमारे एक लाख रुपये कॅश घेऊन सरस्वती कॉलनी परिसरातून जात असताना वाहनातील गाडीची स्पार्किंग झाल्यावर अचानक पेट घेतला बघता बघता अवघ्या दहा मिनिटातच दुचाकी जळून खाक झाली. परिसरातील नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुचाकी पूर्णतः जळून खाक झाली होती.

हेही वाचा - क्रांती रेडकर मराठी मुलगी, तिच्याविषयी आम्हाला प्रेम आहे - संजय राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.