ETV Bharat / state

Shiwaji Maharaj Jayanti 2022 : पाच हजार स्क्वेअर फुटमध्ये साकारली महाराजांची रांगोळी; अनोखे अभिवादन

author img

By

Published : Feb 19, 2022, 9:01 AM IST

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला शहादा येथील वैष्णवी पाटील या बी फार्मसीच्या विद्यार्थिनीने शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पाच हजार स्क्वेअर फूट जागेवर रांगोळीच्या सहाय्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र रेखाटले आहे.

महाराजांची रांगोळी
महाराजांची रांगोळी

नंदुरबार - शिवजयंतीनिमित्त शहादा येथील विद्यार्थिनीने छत्रपती शिवाजी महाराज यांची रांगोळी काढून त्यांना शिवजयंती निमित्त अभिवादन केले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हॉलमध्ये सुमारे पाच हजार स्क्वेअर फूट एवढी रांगोळी या विद्यार्थिनीने 96 तासात रेखाटली आहे. शिवजयंतीच्या दिवशी रांगोळी नागरिकांना पाहण्यासाठी खुली करण्यात येणार आहे, अशी माहिती वैष्णवी पाटील दिली आहे.

5 हजार स्क्वेअर फुटमध्ये महाराजांची रांगोळी

विद्यार्थिनींनी रेखाटली रांगोळी -

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला शहादा येथील वैष्णवी पाटील या बी फार्मसीच्या विद्यार्थिनीने शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पाच हजार स्क्वेअर फूट जागेवर रांगोळीच्या सहाय्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र रेखाटले आहे. या कलाकृतीसाठी या विद्यार्थिनीला पाच ते सहा क्विंटल रांगोळीचा वापर करून ही प्रतिमा साकार करण्यात आली. सलग चार दिवस काम करत ही रांगोळी पूर्ण केली आहे. पहिल्यांदा इतकी मोठी रांगोळी शहादा येथे साकारली गेली असल्याने ही रांगोळी पाहण्यासाठी परिसरातील शिवप्रेमी या ठिकाणी हजेरी लावत आहेत.

महाराजांची रांगोळी
महाराजांची रांगोळी

शिक्षकांनी केली मदत -

पुज्य श्री साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ संचलित फार्मसी कॉलेजच्या प्राचार्य व शिक्षकांनी विद्यार्थिनीला प्रोत्साहन देऊन रांगोळी काढण्यास सहकार्य केले. रांगोळी काढण्यासाठी महाविद्यालयातर्फे विद्यार्थिनीस रांगोळी व कलर उपलब्ध करून दिले व सोबत शिकणाऱ्या विद्यार्थिनींनी व विद्यार्थ्यांनी रांगोळी काढण्यास मदत केली. ही रांगोळी काढण्यासाठी सुमारे पाच ते सहा क्विंटल रांगोळी लागली यासाठी दहा हजार रुपयांचा खर्च आला आहे तर रांगोळी काढण्यासाठी 96 तास लागले असल्याची माहिती वैष्णवी पाटील हिने दिली.

विद्यार्थ्यांनी साकारली महाराजांची रांगोळी

शिवजयंती निमित्त दरवर्षी नवनवीन उपक्रम -

शिवजयंतीनिमित्त वैष्णवी पाटील ही दरवर्षी नवनवीन उपक्रम करीत असते. गेल्या तीन-चार वर्षांपासून विद्यार्थिनी शिवाजी महाराज यांचे चित्र रेखाटून शिवजयंती निमित्त अभिवादन करीत होती. मात्र यंदा विद्यार्थिनीला महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी व सोबत शिकणाऱ्या विद्यार्थिनींनी प्रोत्साहन दिल्यामुळे तिने पाच हजार स्क्वेअर फूट रांगोळी काढण्याचा मानस ठेवून तो साकारला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.