ETV Bharat / state

नंदुरबार रेल्वे स्थानकावर जमावाकडून तुफान दगडफेक; महिलेची छेड काढल्याने उफळला वाद - surat bhusaval passanger

सहप्रवाशांनी महिलेची छेड काढल्याच्या आरोपातून नंदुरबार रेल्वे स्थानकावर दगडफेक झाल्याची घटना घडली. शनिवारी रात्री येणाऱ्या सुरत-भुसावळ पॅसेंजरमध्ये हा सर्व प्रकार घडला.

नंदुरबार रेल्वे स्थानकावर जमावाकडून तुफान दगडफेक करण्यात आली
author img

By

Published : Aug 26, 2019, 11:03 AM IST

Updated : Aug 26, 2019, 11:41 AM IST

नंदुरबार- सहप्रवाशांनी महिलेची छेड काढल्याच्या आरोपातून नंदुरबार रेल्वे स्थानकावर दगडफेक झाल्याची घटना घडली. शनिवारी रात्री येणाऱ्या सुरत-भुसावळ पॅसेंजरमध्ये हा सर्व प्रकार घडला. यानंतर संतप्त जमावाने रेल्वेस्थानक आणि परिसरात दगडफेक केली. यावेळी रेल्वे स्थानकावरुन जाणाऱ्या मालगाडीवर देखील दगडफेड झाली. रेल्वे स्थानकाच्या लगत असणाऱ्या बादशाह नगर परिसरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटुन आले.

नंदुरबार रेल्वे स्थानकावर जमावाकडून तुफान दगडफेक करण्यात आली

या घटनेनंतर जमलेल्या संतप्त जमावाने लाठ्या-काठ्या घेत दगडफेक केली होती. संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी दोन हॅन्ड ग्रेनेड, पाच गॅस सेलचा वापर केला आहे. या दगडफेकीच्या घटनेत एक रेल्वे कर्मचाऱ्यासह एक पोलीस अधिकारी आणि दोन कर्मचारी देखील जखमी झाले आहेत.

विशेष म्हणजे छेडछाड झालेल्या महिलेने अद्यापही तक्रार दिली नसुन सदर महिलेचा देखील शोध घेतला जात आहे. सध्या वातावरण निवळले असुन परिसरात शांतता आहे. लोहमार्ग पोलिसांचे भुसावळ आणि औरंगाबाद येथून वरिष्ठ अधिकारी देखील दाखल झाले असून घटनेची सखोल चौकशी केली जात आहे. दरम्यान, घटनेप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

Intro:Body:

नंदुरबार, रेल्वे स्टेशन परिसरात घडलेल्या घटनेची पोलिसांकडून दखल घेत परिस्थिती नियंत्रणात... तीन जण ताब्यात...

सहप्रवाश्यांनी महिलेची छेड काढल्याच्या आरोपातुन नंदुरबार रेल्वे स्थानकावर दगडफेक झाल्याची घ़डना घडली आहे. रात्री येणाऱया सुरत - भुसावळ पॅसेजरमध्ये हा सर्व प्रकार घडला असुन यानंतर जमलेल्या संतप्त जमावाने रेल्वेस्थानक आणि परिसरात दगडफेक केली. रेल्वे स्टेशन वरुन त्यावेळी जाणाऱया मालगाडीवर देखील दगडफेड झाली आहे. रेल्वे स्टेशनच्या लगत असणाऱया बादशाह नगर  परिसरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटुन आले. 

या नंतर जमलेल्या संतप्त जमावाने लाठया काठ्या घेत दगडफेक केली होती. तणावपूर्ण जमावाला पांगवण्यासाठी पोलीसांनी 02 हॅन्ड ग्रेनेड,  05 गॅस सेल चा वापर केला आहे. या दगडफेकीच्या घटनेत एक रेल्वे कर्मचाऱयासह एक पोलीस अधिकारी आणि दोन कर्मचारी देखील जखमी झाले आहेत.

विशेष म्हणजे छेडखानी झालेल्या महिलेने अद्यापही तक्रार दिली नसुन सदर महिलेचा देखील शोध घेतला जात आहे. सध्या वातावरण निवळले असुन परिसरात शांताता आहे.  

लोहमार्ग पोलीसांचे भुसावळ आणि औरंगबाद येथुन वरिष्ठ अधिकारी देखील दाखल झाले असुन घटनेची सखोल चौकशी केली जात आहे. दरम्यान घटनेप्रकरणी पोलीसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. अन्य आरोपींचा शोध सुरु आहे.

Conclusion:
Last Updated : Aug 26, 2019, 11:41 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.