ETV Bharat / state

नंदुरबार जिल्ह्यासाठी राज्य सरकारकडून 14 रुग्ण वाहिका उपलब्ध - नंदुरबार जिल्हा रुग्णवाहिका

ज्य सरकारच्या वतीने नंदुरबार जिल्ह्यासाठी चौदा रुग्णवाहिका उपलब्ध करून दिले गेले आहेत. त्यापैकी 7 रुग्णवाहिका जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आले असून त्यांचे लोकार्पण जिल्हा अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांच्या हस्ते करण्यात आले.

ambulances for Nandurbar district
ambulances for Nandurbar district
author img

By

Published : May 18, 2021, 8:56 PM IST

Updated : May 18, 2021, 9:03 PM IST

नंदुरबार - राज्य सरकारच्या वतीने नंदुरबार जिल्ह्यासाठी चौदा रुग्णवाहिका उपलब्ध करून दिले गेले आहेत. त्यापैकी 7 रुग्णवाहिका जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आले असून त्यांचे लोकार्पण जिल्हा अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रघुनाथ भोये हे उपस्थित होते राज्य सरकारने अत्याधुनिक अशा चौदा रुग्णवाहिका नंदुरबार जिल्ह्यासाठी उपलब्ध करून दिल्याने रुग्णांना त्याचा मोठा फायदा होणार असून कोरोंना त्याच सोबत ग्रामीण भागातील रुग्णांना अत्यावश्यक आरोग्य सुविधा लवकर मिळण्यासाठी होणार आहे.

राज्य सरकारकडून 14 रुग्ण वाहिका उपलब्ध

राज्य शासनाकडून जिल्ह्यासाठी 7 वातानुकूलीत रुग्णवाहिका प्राप्त -

राज्य शासनाकडून जिल्ह्यासाठी फोर्स कंपनीच्या 7 वातानुकूलीत रुग्णवाहिका प्राप्त झाल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या उपस्थितीत या रुग्णवाहिका रुग्णालय प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आल्या. यामुळे ग्रामीण भागासह शहरी भागातील रुग्णवाहिकेचा गंभीर प्रश्न काही प्रमाणात सुटला आहे.

जिल्ह्यात सात ठिकाणी रुग्णवाहिका सुपूर्द -

जिल्ह्यात ग्रामीण भागातील रुग्णांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकेचा मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण होत होत्या. त्यामुळे या रुग्णवाहिका नवापूर आणि तळोदा उपजिल्हा रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालय विसरवाडी, खांडबारा, म्हसावद, अक्कलकुवा, तोरणमाळ या ठिकाणी उपयोगात आणल्या जातील.

जिल्ह्यात आत्तापर्यंत 42 रुग्णवाहिका उपलब्ध -

जिल्ह्यासाठी आतापर्यंत विविध माध्यमातून 42 रुग्णवाहिका प्राप्त झाल्या आहेत. ग्रामीण भागात आरोग्य सुविधा देण्यासाठी रुग्णवाहिका उपयुक्त ठरत आहेत. जिल्ह्याच्या जनतेला रुग्णवाहिकांचा चांगला उपयोग होईल, असे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

Last Updated : May 18, 2021, 9:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.