नंदुरबार: जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मलगाव येथे शेताच्या बांधावरुन दोन्ही घरांमधे आप आपसात वाद होता. येथिल संपूर्ण खर्डे परिवार दर वेळे प्रमाणे कामाच्या निमित्ताने शेतात गेले होते. या खर्डे परिवारात शेताच्या बांधावरून कायम वाद होत असत. नेहमीच होणाऱ्या वादामुळे परिवारात वाद चिघळला. याक खर्डे यांच्याकडे आलेला त्यांच्या एका पाहुण्याने आज गोळीबार केला जो या घटनेत संशयित आहे. त्याने २४ वर्षीय अविनाश सुकराम खर्डे या अविवाहित तरुणावर बंदुकीने फायरिंग केली असे सांगितले जात आहे.
संपत्तीचे वाद कोणत्या टोकाला जातील याचा काही नेम राहिलेला नाही. त्यातून लहान सहान भांडणासोबत अगदी जीवघेणे हल्ले होताना पहायला मिळतात. वर्षानुवर्षे हे वाद चालतात त्यातून कटूता येते आणि त्यातुन नको ते प्रकार घटतात. असाच एक प्रकार समोर आला आणि या ठिकाणी झालेल्या गोळीबारात अविनाश खर्डे याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुसरी गोळी त्याचे वडील सुकराम खर्डे यांना लागली यात ते आधी गंभीर जखमी झाले. जखमीना तात्काळ खाजगी गाडीने शहादा येथील ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र दरम्यान सुकराम खर्डे यांचा ही मृत्यू झाला.
या घटनेत गावठी कट्ट्याने फायरिंग सोबतच तलवारीचा देखील वापर करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. खर्डे परिवारातील इतर तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असून त्याना रुग्णालयात हलविण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ही घटना गावात वाऱ्या सारखी पसरली. आणि परिसरात दहशत आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले.
गावतील परस्थिती सध्या पोलिसांनी नियंत्रणात आणली. याबाबत शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तर मृतांवर ग्रामीण रुग्णालय शहादा येथे शविच्छेदन करण्यात आहे. घटनेची माहिती मिळताच शहादा पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधिकारी यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे हे घटनास्थळी दाखल झाले. आणि त्यांनी परस्थितीवर नियंत्रण मिळवले.