ETV Bharat / state

जिल्ह्यात 79 कंटेनमेंट झोनमध्ये 90 हजार नागरिकांचे स्क्रिनिंग

author img

By

Published : Jul 16, 2020, 1:02 PM IST

जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला होता. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनाचे एकूण 312 रूग्ण समोर आले आहेत. यातील 176 जण कोरोनामुक्त होवून घरी गेले असले आहेत तर 103 बाधित कोविड कक्षात उपचार घेत आहेत. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 500पेक्षा अधिक जणांना जिल्ह्यातील 10 क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात आले होते.

Nandurbar Corona Update
नंदुरबार कोरोना अपडेट

नंदुरबार - कोरोनाबाधित रूग्ण आढळल्यानंतर तो राहत असलेल्या परिसराला ‘कंटेनमेंट झोन’ घोषित केले जाते. यामाध्यमातून प्रशासन कोरोना संसर्ग रोखण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या तीन महिन्यापासून सुरू असलेल्या या उपक्रमातून नंदुरबारमधील 79 कंटेनमेंट झोनमध्ये 90 हजार नागरिकांचे स्क्रिनिंग झाले आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यात प्रशासनाला बर्‍यापैकी यश आले असून नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यात प्रशासनाला बर्‍यापैकी यश आले असून नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे

जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला होता. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनाचे एकूण 312 रूग्ण समोर आले आहेत. यातील 176 जण कोरोनामुक्त होवून घरी गेले असले आहेत तर 103 बाधित कोविड कक्षात उपचार घेत आहेत. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 500पेक्षा अधिक जणांना जिल्ह्यातील 10 क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात आले होते.

जिल्हा आरोग्य विभागातर्फे ज्या नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे आहेत त्यांचे स्वॅब घेऊन तपासणी करण्यात आली. तत्पूर्वी रुग्णाचा संबध आलेला संपूर्ण परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करत त्याठिकाणी राहणाऱ्या नागरिकांच्या तपासण्या केल्या गेल्या. सुरुवातीला संपूर्ण वॉर्ड किंवा एक गल्ली सील करून त्यात राहणार्‍यांची तपासणी प्रशासनाने केली होती. कालांतराने रुग्णाचे घर आणि हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये आलेल्यांना क्वारंटाइन केले जात आहे. कंटेनमेंट झोनच्या या मॉडेलमुळे रुग्णांची संख्येवर अंकुश ठेवण्यात आरोग्य विभागाला यश आल्याचे चित्र तपासणी झालेल्या झोनमधून समोर आले आहे.

17 एप्रिलला नंदुरबार शहरात पहिला कंटेनमेंट झोन तयार करण्यात आला होता. यातून 964 घरांमध्ये 4 हजार 632 नागरिकांची तपासणी झाली. यानंतर जिल्हाभरात कोरोना संसर्ग झालेले रूग्ण आढळण्यास सुरूवात झाली. जिल्ह्यात सध्या 54 कंटेनमेंट झोन असून 31 झोन पुन्हा सुरू केले गेले आहेत. नंदुरबार शहरात आज अखेरीस 34 अ‍ॅक्टिव्ह झोन आहेत. शहादा शहर व तालुक्यात आजपर्यंत 16 झोन करण्यात आले होते. अक्कलकुवा शहरात 6 ठिकाणी कंटेनमेंट झोन होते तर नवापूर तालुक्यात तीन, तळोदा तालुक्यात पाच, धडगाव तालुक्यात एका ठिकाणी कंटेनमेंट झोन तयार करण्यात आला होता. जिल्ह्यातील सर्व सहा तालुक्यातील एकूण 79 झोनमध्ये 20 हजार 277 घरांची तपासणी करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.