नंदुरबार - सारंगखेडा येथील घोडेबाजाराने गेल्या १२ दिवसात खरेदी-विक्रीचा नवीन उच्चांक प्रस्थापित केला आहे. या बाजारात एकूण ३ हजार घोडे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. त्यापैकी जवळपास ८०० घोड्यांची विक्री झाल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे देण्यात आली आहे. तसेच त्यातून साडेतीन कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे सांगितले जात आहे.
सारंगखेडा चेतक फेस्टिवलमध्ये अश्व स्पर्धांना सुरुवात झाली असून आता घोड्यांच्या खरेदी-विक्रीचा वेग वाढणार आहे. घोडे बाजारात चांगली तेजी पाहायला मिळत असून यावर्षी ५ कोटींचा उच्चांक प्रस्थापित करणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. पंजाब राज्यातील घोडे व्यापारीही येथे दाखल झाल्याने जातिवंत मारवाड घोड्यांची खरेदी-विक्री वाढणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा - 'शान'ची सारंगखेड्यात शानदार एंट्री.. अनेकांना लावले वेड
चेतक फेस्टिवलमध्ये विविध राज्यातून आलेले व्यापारी व त्यांच्याबरोबर प्रजातीचे घोडे दाखल झाले आहेत. त्यामुळे घोड्यांची विक्री व खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. आत्तापर्यंत ३ हजारांच्यावर घोडे विक्रीसाठी दाखल झाले आहेत.
चेतक फेस्टिवलमध्ये आत्तापर्यंत ३ हजारांच्यावर घोडे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. विविध प्रजातीचे घोडे व विविध राज्यातून आलेले व्यापारी येथे दाखल झाले असून त्यातून घोड्यांची विक्री व खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. गेल्या १२ दिवसांत तब्बल ८०० घोड्यांची विक्री झाली असून त्यातून साडेतीन कोटी रुपयांची उलढाल झाल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती व आयोजकांकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा - नंदुरबारमध्ये अवैध मद्यसाठ्यासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त