ETV Bharat / state

रेल्वे प्रवासात कोरोनाबाधिताचे निधन; संघ स्वयंसेवकांनी केले अंत्यसंस्कार - nandurbar rss news

एकीकडे कोरोनामुळे नाती तुटत असतांना दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी कोरोनाबाधितावर अंत्यसंस्कार करुन माणुसकीचे उदाहरण घालून दिले आहे.

कोरोनाबाधितावर अंत्यसंस्कार
कोरोनाबाधितावर अंत्यसंस्कार
author img

By

Published : Apr 29, 2021, 9:46 AM IST

नंदुरबार - गुजरात राज्यातील भरुच येथून एक कुटूंब मुला-बाळांसह कोलकाता येथे जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करत होते. या प्रवासादरम्यान कुटुंबातील पुरूषाचे निधन झाल्याने त्यांचे पार्थिव नंदुरबार रेल्वे स्थानकावर उतरविण्यात आले. पतीत्व व पितृत्व हरपलेल्या महिलेसह मुलांनी रेल्वे स्थानकावरच हंबरडा फोडला. नंदुरबार येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व जनकल्याण समितीच्या पदाधिकार्‍यांनी माहिती मिळताच रेल्वे स्थानक गाठून मृत व्यक्तीच्या कुटूंबियांचे सांत्वन करीत धीर दिला. सदर व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झालेला असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी मृताच्या कुटूंबियांना विश्‍वासात घेत अंत्यसंस्काराची जबाबदारी घेवून शासकीय नियमानुसार मृत व्यक्तीवर अंत्यसंस्काराचा सोपस्कार पार पाडला.

एकीकडे कोरोनामुळे नाती तुटत असतांना दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी कोरोनाबाधितावर अंत्यसंस्कार करुन माणुसकीची मिसाल घडविली आहे.

स्वयंसेवकांनी दिला मृताच्या नातेवाईकांना धीर

गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संसर्ग साखळी तोडण्यासाठी माणसंमाणसांपासून दुरावली जात आहे. कोणी कोणाला भेटत नाही, जो-तो आपला जीव मुठीत घेवून काळजी घेत आहे. अनेक जण कार्यक्रमांनाही जाणे टाळत आहे. तर काही ठिकाणी गरजुंना मदतीची आवश्यकता असतांना कोरोनाच्या भितीने मदत करण्यास कोणी धजावत नसल्याचे चित्रही पहावयास मिळते. कोरोनामुळे आपल्यातील अनेक माणसे हिरावली गेली आणि वर्षभरापासून माणसं दुरावली गेली. या सर्व बाबींना अपवाद वगळता नंदुरबार येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी कोरोना संकटातही कुठलीही भिती न बाळगता रेल्वे प्रवासातच कुटूंबातील कर्ता व्यक्तीचे कोरोनामुळे निधन झाल्याने त्या व्यक्तीच्या पार्थिवावर अंत्यसंस्काराची जबाबदारी सदर स्वयंसेवकांनी घेतली.

रेल्वे प्रवासादरम्यान बाधिताचा मृत्यू

गुजरात राज्यातील एक कुटूंब भरुचहून कोलकाता येथे जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करीत होते. या कुटूंबात एक पुरूष व त्याची पत्नी आणि दोन लहान मुले होते. या प्रवासादरम्यान कुटूंबातील कर्ता पुरूषाचे निधन झाले. त्यामुळे त्या मृत व्यक्तीच्या मृतदेहासह त्याची पत्नी व मुलांना नंदुरबार येथील रेल्वे स्थानकावर उतरविण्यात आले. रेल्वे प्रवासात पतीचा मृत्यू झाल्याने पत्नीने हंबरडा फोडला होता. रेल्वे स्थानकावर मृतदेह उतरविल्यानंतर पत्नी व मुले अश्रु ढाळत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण नंदुरबार जिल्हा कोविड सेवा समितीला मिळाली माहितीया महिलेसह मुलांचे दुःख पहावत नसल्याने काही जणांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देवगिरी प्रांतप्रचारक तथा कोलकाता प्रांतप्रचारक यांना कळविल्याने त्यांनी लागलीच नंदुरबार येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण नंदुरबार जिल्हा कोविड सेवा समितीचे गिरीष बडगुजर यांना भ्रमणध्वनीद्वारे कळविले. यावेळी बडगुजर यांनी माहिती मिळताच पदाधिकार्‍यांसह नंदुरबार रेल्वेस्थानक गाठले. स्थानकात जावून मृत व्यक्तीच्या पार्थिवाजवळ त्याची पत्नी व लहान मुले रडत असल्याने स्वयंसेवक संघाच्या पदाधिकार्‍यांनी त्यांना धीर देत सात्वंन केले.

मृताच्या नातेवाईकांची साधला संवाद

तसेच मयत व्यक्तीचा भाऊ पुण्याहुन नंदुरबारला येण्यासाठी निघाल्याचे कळताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी त्यांच्याशी संपर्क साधला. पुण्याहुन नंदुरबारला येण्यासाठी आपणास किमान 10 तास लागतील, असे सांगुन मयत व्यक्तीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची परवानगी द्यावी, असे त्यांनी मयताच्या भावाला सांगितले. तसेच मयताच्या पत्नीलाही विश्‍वासात घेत मृत व्यक्तीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी स्वीकारली. या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झालेला असल्याने शासकीय नियमानुसार अंत्यसंस्कार करण्यासाठी काही स्वयंसेवक पार्थिव अंत्यविधीसाठी घेवून गेले.

शासकीय नियमानुसार केले अंत्यसंस्कार

स्मशानभूमीत शासकीय नियमाप्रमाणे मयत व्यक्तीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तसेच मयताच्या पत्नी व मुलांची नंदुरबार रेल्वे स्थानकात काही रेल्वे कर्मचार्‍यांनी जेवणाची व राहण्याची व्यवस्था केली. तसेच गुरुवारी सकाळी या परिवाराला त्यांच्या गावी पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना रूग्ण आढळला की, त्या व्यक्ती किंवा त्याच्या कुटूंबियांजवळ अनेक जण जाण्याचे टाळतात. कारण त्यांना कोरोना संसर्गाची भिती असते. मात्र नंदुरबारातील राष्ट्रीय स्वयंसेवक कोविड सेवा समितीच्या पदाधिकार्‍यांनी दाखविलेल्या धैर्यामुळे माणुसकीच्या मिसाल निर्माण केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.