नंदुरबार - अहिंसा पब्लीक स्कुल आणि रोटरी आय हॉस्पीटल दोंडाईचा यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार मधील दिडशेहुन अधिक गरजुंना किराण्यासह शिधाचे वाटप करण्यात आले आहे. या सर्वांना आठ दिवस पुरेल इतक्या आवश्यक वस्तुंचा यात समावेश होता. गहू, तांदुळ, साखर, चहा तुरदाळ, मठ, चवळी, चहा पावडर, मिर्ची, हळद, तेल साबण अशा रोजच्या निगडीच्या वस्तुंचा यात समावेश होता.
शहरातील गिरीविहार परिसरात झालेल्या या कार्यक्रमात सोशल डिस्टंसिग पाळण्यात आली. याठिकाणी दानशुरांसह लाभार्थ्यांनी शिस्त दाखविली. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी १४ तारखेपर्यंत होम क्वारंटाईनच्या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाला आमदार डॉ. विजयकुमार गावित, सहाय्यक जिल्हाधिकारी वसुमना पंत देखील उपस्थित होत्या. तर अहिंसा स्कुलचे राजेश व सौरभ मुनत, रोटरी आय हॉस्पीटल डॉ. फुलंब्रीकर, मुकुंद सोहणी , डॉ रोशन भंडारी, व राजेश आणि भावेश जैन उपस्थित होते. तहसिलदार भाऊसाहेब थोरात आणि नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबुराव बिक्कड हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते.