ETV Bharat / state

nandurbar rape case बलात्कारानंतर 42 दिवस उलटूनही पीडितेचा मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत, न्यायासाठी बापाचा व्यवस्थेशी संघर्ष - rape and murder

नंदुरबार जिल्ह्यातील अतिदूर्गम भागात असणाऱ्या गावातील (rape in Nandurbar) बलात्कार पिडीतेचा मृतदेह 42 दिवस उलटूनही अद्याप (victim body awaits cremation) अंत्यसंस्काराविनाच आहे. पिडीतेचे वडील, काका, गावकरी न्यायासाठी व्यवस्थेचे उंबरठे झिजवत आहेत. पित्याने मुलीचा मृतदेह मिठात पुरून ठेवला आहे. अखेर प्रशासनेने मृतदेहाचे पुनर्विच्छेदन (Resection) करण्याचा निर्णय घेतला आहे.

nandurbar rapr case
बलात्कारानंतर 42 दिवस उलटूनही पिडीतेचा मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत, न्यायासाठी बापाचा व्यवस्थेशी संघर्ष
author img

By

Published : Sep 13, 2022, 7:44 PM IST

Updated : Sep 13, 2022, 8:09 PM IST

नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम असलेल्या नंदुरबारमधील महिलेवर बलात्कार झाल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी मृतदेह मिठात पुरून ठेवला. न्याय मिळत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका प्रशासनासमोर मांडली. मृत्युनंतर एक दोन नव्हे तर तब्बल 42 दिवस उलटुन देखील एका बापाने आपल्या मुलीला न्याय मिळावा यासाठी तिचा अंत्यसंस्कार न करता तिचा मृतदेह मीठाच्या खड्ड्यात पुरुन ठेवला आहे. मुलीवर बलात्कार होऊ तिचा खून झाला असतानाही पोलिसांनी फक्त आत्महत्येचा गुन्हा नोंदवून घेतला, इतकच नव्हे तर शवविच्छेदन अहवालात देखील तिच्यावर अत्याचारांबाबत काहीही तपासणीच करण्यात आली नाही. त्यामुळेच या बापाने ग्रामस्थांच्या मदतीने आता व्यवस्थेविरोधातच लढा सुरु केला आहे. अखेर प्रशासनातर्फे घटनास्थळी जाऊन पोस्टमार्टम करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

बलात्कारानंतर 42 दिवस उलटूनही पीडितेचा मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत, न्यायासाठी बापाचा व्यवस्थेशी संघर्ष

बलात्कार करून खून झाल्याचा नातेवाईकांचा आरोप ( Relatives allege rape and murder ) विवाहीत मुलीला तालुक्यातील वावी येथील रहिवासी रणजीत ठाकरे आणि अन्य एकजण बळजबरीने गाडीवर बसवून 01 ऑगस्ट 2022 ला गावाबाहेर घेवुन गेले. यानंतर मुलीने नातलगाला आलेल्या फोनमध्ये तिच्यासोबत रणजीतसह चार जणांनी चित्रपटाप्रमाणे कुकर्म करत असल्याचे तिने सांगितले. ते मारुन टाकतील असे मृत पीडितेने सांगितले. काही काळातच तिने एका आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा तिच्या कुटुंबीयांना फोन आला. तिचे कुटुंबीय घटनास्थळी पोहचण्याआधीच गावातील लोकांच्या मदतीने तिचा मृतदेह उतरुन घेत पुरावे नष्ट केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. विशेष म्हणजे तिच्यावर बलात्कार झाल्याचे पोलीसांना सांगूनदेखील मृत पीडितेच्या शवविच्छेदन अहवालात याबाबत कुठलीही तपासणी झाली नसल्याचे समोर आले आहे. तिच्या आत्महत्येचा बनाव (Faking suicide) रचण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.

पित्याने मिठात पुरून ठेवला मुलीचा मृतदेह शवविच्छदेनाच्या अहवालानंतर पोलीसांनी या घटनेप्रकरणी आत्महत्येचा गुन्हा नोंदवुन घेतला. आणि या प्रकरणात संशयीत रणजीत ठाकरेसह तिघांना अटक केली. मात्र, मुलीवर बलात्कार होवुन तिची हत्या झाली असताना पोलीसांच्या या भुमिकेमुळे मुलीचे मृतदेह अंतिम संस्कारासाठी ताब्यात मिळाल्यानंतर वडिलांनी अंत्संसंस्कार केले नाहीत. त्यांनी आपल्या घराशेजारच्या शेतात खड्डा करुन त्याठिकाणी मिठातचं आपल्या मुलीच्या मृतदेहाला पुरले आहे. कठीण प्रसंग ग्रामस्थदेखील कुटुंबीयासमवेत उभे आहेत.

मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलं पिडीतेच्या वडिलांचं गाऱ्हाणं ठाणे येथील सामाजिक कार्यकर्त्या परिणीती पोंक्षेंच्या मदतीने थेट मुख्यमंत्र्याच्या कानावरही अंतीम संस्कार झाले नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली आहे.

पीडितेचा मृत्यू आधी व्हायरल झालेल्या ऑडीओ क्लीपची तपासणी करुन त्यात जर तथ्य असेल तर त्याबाबत पोलिसांनी आधीच ठोस पाऊल उचलने गरजेचे होते. अशातच तिच्या आत्महत्या झालेल्या फोटोमधुनदेखील काही तात्रींक बाबी उपस्थित करत प्रश्नचिन्ह निर्माण केला जात आहे. त्यामुळेच शवविच्छेदन अहवालानंतर प्रशासन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

Last Updated : Sep 13, 2022, 8:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.