नंदुरबार - आपला अनिल देशमुख होईल, ही राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांना भीती आहे. याच भीतीतून ते केंद्रीय तपास यंत्रणेवर आरोप-प्रत्योराप करून ग्राऊंड तयार करत असल्याची टिका राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांनी केली आहे. राज्यात भाजपाचे सरकार येणारच आहेत, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. ते माध्यमांशी बोलत होते.
शहादा तालुक्यातील सातपुडा सहकारी साखर कारखान्याच्या ( Satpuda cooperative sugar factory program ) यंदाच्या गळीत हंगामाच्या शुभारंभ आज शनिवारी करण्यात आला. या कार्यक्रमासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर ( Pravin Darekar visit at Nandurbar ) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.
कुठलीही टिका केली तरी राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखविते-
माध्यमांशी बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले, की राज्यातील सरकार हे महाविकास आघाडी पेक्षाही वसुली सरकार म्हणुन बदनाम झाले. राज्यात ईडीच्या कारवाया ( Pravin Darekar criticized MH go over ED probe ) या आमच्या सांगण्यावरून होत नाहीत. त्या यंत्रणा आपल्या चौकटीत राहून काम करत असल्याचे स्पष्ट केले आहे. जर केंद्रीय तपास यंत्रणांनी चुकीचे काम केले तर न्याय व्यवस्था आहेच, असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर चौफेर टिका केली. कुठलीही टिका केली तरी राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवून आपले अपयश लपविते. यातूनच दरेकरांनी सामनाच्या आजच्या अग्रलेखावर टिका केली आहे.
कोरोना सरकारसाठी पर्वणी; आदिवासींच्या आर्थिक उन्नतीकडे दुर्लक्ष
प्रवीण दरेकर म्हणाले, की महाविकास आघाडीने कोणत्याही घटकांकडे लक्ष दिले नाही. कोरोनाचे संकट सरकारसाठी पर्वणी ठरली आहे. लॉकडाऊनमध्ये सुरू झालेल्या खावटी अनुदान योजनेच्या माध्यमातून दलालांचे हित साध्य करण्यात आले. आदिवासींच्या विकास व आर्थिक उन्नतीच्या संदर्भात कोणतीही भूमिका राज्य सरकारने घेतली नाही. हे राज्याचे दुर्दैवी असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.
देवेंद्र फडणवीसांकडून राज्याची प्रगती
पुढे विरोधी पक्षनेते दरेकर म्हणाले, की भाजपच्या 5 वर्षाच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला प्रगतीकडे नेले. त्यामुळे अनेक प्रकल्प, योजनांच्या माध्यमातून आमुलाग्र बदल झाला. परंतु, महाविकास आघाडी सरकारच्या योजना वेगळ्याच आहेत. कंत्राटदार, वाझेसारख्या भ्रष्ट अधिकारी व समीर वानखेडे हाच प्रश्न असल्याचे सरकारला वाटते. दोन वर्षातील राज्य सरकारचे अपयश झाकण्यासाठी, लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी सत्ताधारी केंद्रातील सरकार व भाजपवर टीका करीत असतात. दोन वर्षात सरकारने काय केले, यावर महाविकास आघाडीचे नेते बोलायला तयार नाहीत.
सातपुडा सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ
साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभाला आमदार राजेश पाडवी, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, माजी आमदार शिरीष चौधरी उपस्थित होते. यावेळी प्रविण दरेकर म्हणाले, नंदुरबार जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे ऊसाची लागवड कमी झाली. अशा परिस्थितीत उत्पादक, कामगार व कारखान्यांशी सरकारने समन्वयाची भूमिका घेऊन पाठबळ द्यावे.