ETV Bharat / state

नवापूर पोलिसांकडून छापा टाकून १८ लाखांचा दारुसाठा जप्त - gujrat

नवापूर शहरात पोलिसांनी मोठी कारवाई केल्याने दारू तस्कारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दारू तस्करी
author img

By

Published : Jul 31, 2019, 9:55 AM IST

नंदुरबार - नवापूर तालुक्यातील गडद सागीपाडा गावाच्या जंगलात गुजरात-महाराष्ट्र सीमावर्ती भागात रात्रीच्या सुमारास नवापूर पोलिसांनी दोन ठिकाणी छापे टाकले. यात पोलिसांकडून १८ लाखांचा दारुसाठा जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे दारु तस्करीची आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

दारू साठा जप्त

मध्य प्रदेश राज्यातून दारु तस्करी करणारे किशोर पाटील, रवि गिरासे यांना नंदुरबार शहरातून अटक करण्यात आली आहे. तर सागीपाडा व गडद येथील जागा मालक ईलियास रतिलाल गावित, रा. सागीपाडा आणि शिवाजी सेगजी गावित रा. गडद यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दोन्ही संशयित आरोपी फरार असून नवापूर पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

नवापूर शहरात पोलिसांनी मोठी कारवाई केल्याने दारू तस्कारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात दारू तस्करी चालत असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी करता तरी काय, असा सवाल या कारवाई दरम्यान उपस्थित केला जात आहे. या कारवाईत पोलिसांनी सागीपाडातून विदेशी दारू आय.बीचे १०३ बॉक्स आणि गडद येथून १६२ बॉक्स असे एकूण १८ लाखांचा माल हस्तगत केला आहे.

Intro:Anchor नंदुरबार- नवापूर तालुक्यातील गडद सागीपाडा गावाचा जंगलात गुजरात-महाराष्ट्र सीमावर्ती भागात भर पावसात रात्रीच्या सुमारास नवापूर पोलीसांनी दोन ठिकाणी छापे टाकून झोपडीत १८ लाखांचा दारू साठा जप्त करण्यात आला. दारू तस्करीची आंतरराज्य टोळीचा पर्दाफास करण्यात आला आहे.Body:दारू मध्य प्रदेश राज्यातून आणणारे दारू तस्कर किशोर पाटील, रवि गिरासे यांना नंदुरबार शहरातून अटक करण्यात आली आहे.सागीपाडा व गडद येथील जागा मालक ईलियास रतिलाल गावित, रा सागीपाडा शिवाजी सेगजी गावित रा. गडद यांच्या गुन्हे दाखल करण्यात आले आहे.दोन्ही संशयित आरोपी फरार असून नवापूर पोलीस शोध घेत आहे. नवापूर शहरात पोलिसांनी मोठी कारवाई केल्याने दारू तस्कारामध्ये भीती वातावरण निर्माण झाले आहे. नंदुरबार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिका-याचा नाकावर टिचून कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात दारू तस्करी चालत असताना नेमका राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी करता तरी काय असा सवाल या कारवाई दरम्यान उपस्थित केला जात आहे.Conclusion:विदेशी दारू आय.बी चे १०३ बाॅक्स सागीपाडा आणि १६२ बाॅक्स गडद येथून एकूण १८ लाखाचा हस्तगत करून पंचनामा पोलिस ठाण्यात ठेवण्यात आला आहे.
Byte पोलिस निरीक्षक नवापूर पोलीस स्टेशन
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.