नंदुरबार - शहरातील आणखी एका रुग्णाला कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी शहरातील नागाई नगर परिसरात एका 41 वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी त्याच्या परिवारातील सर्व सदस्यांचे वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती त्यानुसार नागाई नगरमधील रुग्णाचे 67 वर्षीय वडिलांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत प्रशासनाला कोरोना तपासणी अहवाल प्राप्त झाले. त्यात शहादा तालुक्यातील हिंगणी व नंदुरबार शहरातील संभाव्य व्यक्तींच्या अहवालांचा समावेश आहे.
नंदुरबार शहरातीस नागाई नगरमधील मुंबईहून परतलेल्या 41 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. सदर युवक कोरोनाबाधित झाल्यानंतर परिवारासोबत राहिल्याने खबरदारीचा उपाय म्हणून परिवारातील सर्व सदस्यांची वैद्यकीय अहवाल चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यानंतर त्याच्या संपर्कातील नातेवाईकांना क्वारंटाईन करण्यात आले होते. यामध्ये त्याचे आई वडील, भाऊ, पत्नी, मुलगी यांचा समावेश आहे. या नातेवाईकांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 67 वर्षीय व्यक्तीचा अहवाल प्राप्त झाला असून त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या व्यक्तीचा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
एकूण पॉझिटिव्ह - 37
संसर्गमुक्त झालेले - 28
मृत्यू - 3
उपचार घेत असलेले - 6