ETV Bharat / state

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; धुळे-सूरत महामार्गावरील घटना

धुळे-सूरत महामार्गावर भरधाव वेगातील ट्रकच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण जखमी झाल्याची घटना नवापूर येथे घडली.

author img

By

Published : Jan 2, 2020, 2:21 PM IST

nandurbar
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

नंदुरबार - भरधाव वेगातील ट्रकच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर, एकजण जखमी झाल्याची घटना धुळे-सुरत महामार्गावर नवापूर येथे घडली. याप्रकरणी ट्रकचालक योगेश धर्मा गावित (रा.सोनखांब ता. नवापूर) याच्याविरुध्द नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्‍वर ताराचंद खैरनार (वय 32) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून गोकुळ ताराचंद खैरनार (वय 65) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे.

बारडोली येथील ज्ञानेश्‍वर खैरनार व गोकुळ खैरनार हे दोघे भाऊ दुचाकीने धुळे-सूरत महामार्गावरून जात होते. दरम्यान, भरधाव वेगातील ट्रकने समोरून दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने ज्ञानेश्‍वरचा जागीच मृत्यू झाला. तर, गोकुळ हे जखमी झाले आहेत. ही घटना नवापूर शहरातील नगरपालिका गार्डनजवळ घडली. या अपघातात दुचाकीचे नुकसान झाले असून सचिन शांतीलाल मिस्त्री यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार ट्रक चालकावर मोटार वाहन कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

हेही वाचा - नंदुरबारमध्ये प्रचाराला वेग; प्रचार साहित्यांनी सजली दुकाने

हेही वाचा - अडीच लाखांचा अवैध लाकूडसाठा जप्त; नंदुरबार-नवापूर वनविभागाची दोघांवर कारवाई

Intro:नंदुरबार - धुळे-सुरत महामार्गावर भरधाव वेगातील मालट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना नवापुर येथे घडली. तसेच एक जण जखमी झाला आहे. याप्रकरणी ट्रक चालकाविरुध्द नवापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Body:बारडोली येथील ज्ञानेश्‍वर ताराचंद खैरनार व गोकुळ ताराचंद खैरनार हे दोघे भाऊ दुचाकीने धुळे-सुरत महामार्गावरुन जात होते. यावेळी भरधाव वेगातील मालट्रकने समोरुन दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने ज्ञानेश्‍वर ताराचंद खैरनार (वय 32) हे जागीच ठार झाले. तसेच गोकुळ ताराचंद खैरनार (वय 65) हे जखमी झाले आहेत. अपघातात दुचाकीचे नुकसान झाले असुन ही घटना नवापुर शहरातील नगरपालिका गार्डनजवळ घडली. याबाबत सचिन शांतीलाल मिस्तरी यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक चालक योगेश धर्मा गावित (रा.सोनखांब ता.नवापुर) याच्याविरुध्द भादंवि कलम 304 (अ), 279, 337, 338, 427, मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास असई पवार करीत आहेत.Conclusion:नंदुरबार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.