नंदुरबार - जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील नंदुरबार, तळोदा, शहादा, अक्कलकुवा, नवापूर, धडगाव या सहा पंचायत समितींसाठी सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येत आहे. 7 जानेवारीला मतदान तर 8 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे 18 डिसेंबरपासून नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरुवात झाली. सोमवारी दिनांक 23 डिसेंबरला नामांकन दाखल करण्याची अखेरची मुदत होती. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी तहसील कार्यालयात एकच गर्दी केली होती.
हेही वाचा... आंध्र प्रदेशमध्ये एनआरसी लागू करणार नाही; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
अखेरच्या दिवशी जिल्ह्यातून परिषद आणि समित्यांसाठी एकूण 1145 अर्ज दाखल झाले. दरम्यान, आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या 56 गटासाठी एकुण 533 तर पंचायत समितींच्या 112 गणांसाठी एकुण 754 अर्ज, असे एकुण 1287 नामांकन अर्ज दाखल केले आहेत. सर्वाधिक अर्ज शहादा तालुक्यातील गटासाठी 137 तर गणासाठी 172 अर्ज दाखल झाल्याची नोंद आहे. मंगळवार 24 डिसेंबरला अर्ज छाननीची प्रक्रिया होणार असल्याने आता त्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
हेही वाचा... #CAA : स्थलांतरितांसाठी नरेंद्र मोदी हे 'देवा'प्रमाणे, शिवराज सिंह चौहान बरळले
सोमवारी अक्कलकुवा तालुक्यातील गटासाठी 80 व गणासाठी 131 अर्ज प्राप्त झाले. तर अक्राणी तालुक्यातील गटासाठी 74 अर्ज आणि गणासाठी 101 अर्ज प्राप्त झाले. तळोदा तालुक्यातील गटासाठी 38 व गणासाठी 57 अर्ज, शहादा तालुक्यातील गटासाठी 121 व गणासाठी 156 अर्ज प्राप्त झाले. नवापूर तालुक्यातील गटासाठी 51 तर गणासाठी 95 अर्ज दाखल करण्यात आले. नंदुरबार तालुक्यातील गटासाठी 106 व गणासाठी 141 अर्ज, असे एकूण गट व गण मिळुन 1145 अर्ज दाखल झाले आहेत.
हेही वाचा... ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर.. आता 'या' तारखेला लागणार मुहूर्त
नामांकन दाखल प्रक्रियेच्या 5 दिवसांच्या कालावधीत जिल्हा भरातुन जिल्हा परिषदेच्या 56 गटासाठी 533 तर पंचायत समितींच्या 112 गणांसाठी 754 अर्ज असे एकूण 1287 अर्ज इच्छूकांनी दाखल केले. त्यात अक्कलकुवा तालुक्यातील 10 गटांसाठी 54 अर्ज व 20 गणांसाठी 159 अर्ज, अक्राणी तालुक्यातील 7 गटांसाठी 77 तर 14 गणांसाठी 102 अर्ज, तळोदा तालुक्यातील 5 गटांसाठी 40 अर्ज तर 10 गणांसाठी 63 अर्ज, शहादा तालुक्यातील 14 गटांसाठी 137 तर 28 गणांसाठी 172, नवापूर तालुक्यातील 10 गटांसाठी 52 तर 20 गटांसाठी 96 आणि नंदुरबार तालुक्यातील 10 गटांसाठी 133 तर 20 गणांसाठी 162 इतके अर्ज दाखल झाले आहेत.
हेही वाचा... राघोबादादा जरा आनंदीबाईला आवरा.. महिला शिवसैनिकांनी अमृता फडणवीसांच्या फोटोला मारले जोडे