ETV Bharat / state

नंदुरबारमध्ये दुचाकीच्या डिक्कीतून पळवले पैसे, सीसीटीव्हीत चोरीचा प्रकार कैद

नंदुरबारमधील आझाद लस्सी या दुकानासमोर एक दुचाकी (एम.एच. ३९ डी ८१६०) उभी होती. ही दुचाकी घनश्याम मुडके यांची होती. गाडीच्या डिक्कीत त्यांनी दीड लाख रुपये ठेवले होते. त्यांच्यावर पाळत ठेवत चोरांनी त्यांच्या पैशांवर हात साफ केला.

या दुचाकीतून पैसे पळवण्यात आले
author img

By

Published : Apr 14, 2019, 12:33 PM IST

नंदुरबार - दुचाकीच्या डिक्कीतून दीड लाखांची रक्कम लंपास केल्याचा प्रकार नंदुरबारमध्ये समोर आला आहे. ही घटना शहराच्या मध्यवर्ती भागात घडली. चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

सीसीटीव्ही चलचित्र

नंदुरबारमधील आझाद लस्सी या दुकानासमोर एक दुचाकी (एम.एच. ३९ डी ८१६०) उभी होती. ही दुचाकी घनश्याम मुडके यांची होती. गाडीच्या डिक्कीत त्यांनी दीड लाख रुपये ठेवले होते. त्यांच्यावर पाळत ठेवत चोरांनी त्यांच्या पैशांवर हात साफ केला.

दुकानासमोर उभी असलेल्या दुचाकीची डिक्की एकजण उघडून गेला. त्यानंतर दुसऱ्याने येऊन त्यातील पैसे पळवले. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पैसे गेल्याचे समजताच घनश्याम मुडके यांनी पोलिसात धाव घेतली. यासंबंधी नंदुरबार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Intro:नंदुरबार, मोटारसायकलच्या डिक्कीतून दीड लाख रुपयांची चोरी, cctv कॅमेरात चोरीचा सर्व प्रकार कैदBody:शहरातील गजबजलेल्या भागात असलेले आझाद लस्सी दुकाना समोर उभी असलेली MH 39 D 8160 दुचाकी वाहनांच्या डिक्कीतून दीड लाख रुपयांची रोख रक्कम चोरीला गेल्याची घटना घडली ही संपूर्ण घटना cctv कॅमेरात कैद झाली,Conclusion:घनश्याम मूडके यांची दुचाकी वाहनातून चोरी झाली याबाबत नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.