ETV Bharat / state

चेतक महोत्सवामध्ये पाच दिवसात सव्वादोन कोटींचा टप्पा पार, नव्या विक्रमाची शक्यता - chetak festival

सारंगखेडा येथे दत्त जयंतीपासून सुरू झालेल्या घोडेबजारात विक्रमी अशी आवक झाली. या महोत्सवात देशभरातून जवळपास ३ हजार घोडे विक्रीसाठी दाखल झाले होते. यामध्ये आवघ्या ५ दिवसात विक्रमी ४८५ घोड्यांची विक्री झाली असून त्यातून २ कोटी २५ लाख रुपयांची उलाढाल झाली आहे.

chetak
चेतक महोत्सव
author img

By

Published : Dec 17, 2019, 1:29 PM IST

Updated : Dec 17, 2019, 2:52 PM IST

नंदुरबार - देशातील सर्वात मोठा घोडेबाजार म्हणून सारंगखेडा येथील घोडे बाजारची ओळख आहे. यावर्षी घोडेबजाराने सर्वच विक्रम मोडीत काढत नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. यात्रेच्या पाचवा दिवशी तब्बल सव्वादोन कोटी रुपयांची घोड्यांची विक्री झाली आहे.

चेतक महोत्सव

यावर्षी सारंगखेडा येथे दत्त जयंतीपासून सुरू झालेल्या घोडेबजारात विक्रमी अशी आवक झाली आहे. या महोत्सवात देशभरातून जवळपास ३ हजार घोडे विक्रीसाठी दाखल झाले होते. यामध्ये आवघ्या ५ दिवसात विक्रमी ४८५ घोड्यांची विक्री झाली असून त्यातून २ कोटी २५ लाख रुपयांची उलाढाल झाली आहे.

हेही वाचा - राजवीर व कल्याणी ठरले सारंखेड्याच्या घोडे बाजारातील वैशिष्ट

१५ दिवस चालणाऱ्या या बाजारात यावर्षी घोडे विक्रीतून तब्बल ५ कोटीपर्यंतची विक्रमी उलाढाल होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घोडे बाजारात झालेली यावर्षीची आवक ही गेल्या ५० वर्षातील घोडे बाजारातील सर्वात जास्त आवक असल्याचे सांगितले जात आहे.

जातिवंत आणि रुबाबदार किमती घोड्यांच्या खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या या घोडेबाजारात उद्या(बुधवार)पासून उलाढालीचा वेग वाढेल असे सांगण्यात येत आहे. कारण, उद्यापासून विविध अश्व स्पर्धांना सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी आलेल्या घोड्यांना खरेदी करण्यास पसंती अधिक असते. या स्पर्धांमध्ये घोड्याची रेस, नृत्य आणि अश्व सौंदर्य स्पर्धांचा समावेश असणार आहे.

हेही वाचा - चेतक महोत्सवामध्ये १ कोटींची उलाढाल, यंदा नवा विक्रम यंदा होण्याची शक्यता

Intro:नंदुरबार - देशातील सर्वात मोठा घोडेबाजार म्हणून सारंगखेडा येथील घोडेबाजारची ओळख यावर्षी घोडेबजाराने सर्वच विक्रम मोडीत काढत नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. यात्रेच्या पाचवा दिवशी तब्बल सव्वादोन कोटी रुपयांची घोड्यांची विक्री झाली आहे. Body:यावर्षी घोडेबजारात विक्रमी अशी आवक झाली असून देशभरातून तीन हजार घोडे विक्रीसाठी दाखल झाले असून आवघ्या पाच दिवसात विक्रमी 485 घोड्याची विक्री झाली आहे. त्यातून 2 कोटी 25 लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. पंधरादिवस चालणाऱ्या या बाजारात यावर्षी घोडे विक्रीतून 5 कोटी पर्यत विक्रमी उलाढाल होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गेल्या 50 वर्षातील घोडे बाजारातील सर्वात जास्त आवक झाल्याचे सांगितले जात आहे. जातिवंत आणि रुबाबदार किमती घोड्यांचा खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या या घोडेबाजारात उद्या पासुन उलाढालीचा वेग वाढेल. कारण विविध अश्व स्पर्धांना सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी आलेल्या घोड्यांना खरेदी करण्यास पसंती अधिक असते यात घोड्याची रेस, नृत्य आणि अश्व सौंदर्य स्पर्धाचा समावेश असणार आहे.Conclusion:नंदुरबार
Last Updated : Dec 17, 2019, 2:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.