नंदुरबार - पक्षाचे संघटन मजबूत व्हावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सध्या नंदुरबार जिल्ह्यात तालुकानिहाय कार्यकर्ता मेळावे घेण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर शनिवारी शहादा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला.
हेही वाचा... सारखे सांगून समजत नसेल तर धडा शिकवावा लागतो, पवारांचा भाजपला टोला
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नंदुरबार जिल्ह्यातील पक्ष संघटन मजबूत व्हावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने नंदुरबार जिल्ह्यात तालुकानिहाय कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर शहादा येथील दैनिक मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पक्षाचे निरीक्षक म्हणून नारा मारले आणि माजी आमदार अनिल गोटे यांची उपस्थिती होती.
यावेळी मेळाव्यात पक्षातील कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. तसेच काही तालुक्यातील कार्यकर्त्यांची मते जाणून घेतल्यानंतर नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाची घोषणा केली जाणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विस्तार वाढण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी या बैठकांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.
हेही वाचा... शिवसेनेत बच्चू कडू विरुद्ध अब्दुल सत्तार, ...तो अधिकार सत्तारांना नाही