नंदुरबार - नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. सरदार सरोवराच्या प्रकल्पात 138 मीटरपेक्षा जास्त पाणी साठा केल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील मनिबेली ते बादल या गावांच्या दरम्यान नर्मदा काठावरील जवळपास 100 हून अधिक घरांपर्यंत नर्मदा नदीचे पाणी पोहोचले आहे. जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
हे ही वाचा - 'तुमचे बापजादे गुरुकुलात शिकत होते, त्यावेळी आमचे बापजादे मैला उचलत होते'
सरदार सरोवराच्या प्रकल्पात 138 मीटरपेक्षा जास्त पाणी साठा केल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील मनिबेली ते बादल या गावांच्या दरम्यान नर्मदा काठावरील जवळपास 100 हून अधिक घरांपर्यंत नर्मदा नदीचे पाणी पोहोचले आहे. शेती आणि नर्मदा नवनिर्माण अभियानातर्फे चालविण्यात येणाऱ्या मनिबेली येथील जीवन शाळेपर्यंत नर्मदेचे पाणी पोहोचले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही याचा धोका निर्माण होऊ शकतो. जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. मंगळवारी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारापर्यंत आंदोलक पोहोचले असताना याच ठिकणी विद्यार्थी आणि आंदोलकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. जोपर्यंत जिल्हा प्रशासन ठोस भूमिका घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.
हे ही वाचा - भाजपच्या 240 पेक्षा जास्त जागा येतील - गिरिश महाजन