नंदुरबार - जिल्हा परिषदेत भाजपच्या पक्ष गटनेतेपदी डॉ. कुमिदिनी विजयकुमार गावित यांची नियुक्ती करण्यात आली. गावित यांच्या नियुक्ती पत्रावर भाजपच्या 23 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 सदस्य, असे एकूण 26 सदस्यांची स्वाक्षरी आहे. जिल्हा परिषदेसाठी भाजपने निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांच्याकडे पक्षाची गट नोंदणी केली आहे.
हेही वाचा... 'देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना निधी दिला नाही; मात्र, असलेला निधी पळवून नेला'
भाजपच्या पक्ष गटनेतेपदी डॉ. कुमिदिनी विजयकुमार गावित यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. भाजपच्या पक्ष गटनेतेपदी डॉ. कुमिदिनी विजयकुमार गावित यांच्या नियुक्तीवर भाजपच्या 23 व राष्ट्रवादीचे 3 सदस्य, असे एकूण 26 सदस्यांच्या स्वाक्षरीचे नियुक्तीपत्र उपजिल्हाधिकारी सुपूर्द करण्यात आले. भाजपकडे नंदुरबार जिल्हा परिषदेत 23 सदस्यांचे संख्याबळ आहे. गट नोंदणीवेळी राष्ट्रवादीचे तीन सदस्यांनी भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे भाजप व राष्ट्रवादीचे गटबंधन झाल्याचे दिसत आहे.
हेही वाचा... 'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' पुस्तकाचा वाद, हिंगोलीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून निषेध
याप्रसंगी भाजपच्या खासदार डॉ. हिना गावित, आमदार डॉ. विजयकुमार गावित, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, राष्ट्रवादीचे नेते तथा माजी आमदार शरद गावित यांच्यासह भाजपचे 23 व राष्ट्रवादीचे तीन, असे एकूण 26 सदस्य उपस्थित होते. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस व भाजपला समान 23 जागा मिळाल्या. तर शिवसेनेला सात, राष्ट्रवादीला तीन जागा मिळाल्या. उपजिल्हाधिकारी यांना नियुक्तीपत्र सुपूर्त केल्यानंतर सर्व सदस्यांना अज्ञातस्थळी रवाना करण्यात आले.
हेही वाचा.. गातेगावच्या शेतकऱ्यांची व्यथा : 'ध' चा 'म' झाला अन् योजनेपासून बळीराजा वंचित राहिला
राज्यात विधानसभेच्या निवडणुकीनंतर रंगलेले सत्ता संघर्षाचे नाट्य नंदुरबार मध्येही पहायला मिळाले. मात्र, 17 जानेवारीपर्यंत नंदुरबार जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याची मुदत आहे. त्यामुळे आता नंदुरबार जिल्हा परिषदेवर नेमकी कोणाची सत्ता स्थापन होईल? याकडे नंदुरबार जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे.