ETV Bharat / state

नंदुरबारमध्ये पाण्याची स्थिती चिंताजनक;  दुर्गम भागातील गावांना गाढवाद्वारे पाणीपुरवठा - zilla parishad

तापी नदीजवळील बोरवेलद्वारे तळोदा शहराला रोज ९०% पाणीपुरवठा केला जातो. तसेच या शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी तापी नदीवरील हातोडा फुलाजवळ शहराला पाणी पुरवण्यासाठी सोय करण्यात आली आहे.

नंदुरबार पिण्याच्या पाण्याची स्थिती कायम
author img

By

Published : May 27, 2019, 6:16 PM IST

नंदुरबार - जिल्ह्यात शहादा, तळोदा, नंदुरबार, नवापूर या तालुक्यात नगरपालिकेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. तर अक्कलकुवा, धडगाव आणि ग्रामीण भागात जिल्हा परिषदेअंतर्गत पाण्याचे नियोजन केले जात आहे. नंदुरबार शहराला नगरपालिकेद्वारे ५ किलोमीटरवर असलेल्या विरचक धरणातून पाणीपुरवठा केला जातो. या धरणात सद्यस्थितीत १६.५२ टक्के पाणी शिल्लक आहे, अशी माहिती नंदुरबार नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली आहे.

नंदुरबार पिण्याच्या पाण्याची स्थिती कायम

नंदुरबार शहराला एका दिवसाआड फक्त अर्धा तास पाणीपुरवठा केला जातो. वीरचक धरणातील पाणीसाठा जून महिन्याच्या अखेरपर्यंत पुरेल इतकाच आहे, असे नगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. शहादा शहराला तापी नदीवर बांधलेल्या सारंखेडा बॅरेजमधून पाणीपुरवठा केला जातो. शहादा शहराला रोज पाणीपुरवठा केला जातो. शहरात पाण्याची टंचाई नाही तसेच सारंखेडा बॅरेजमध्ये मुबलक पाणी असल्याने टँकरची संख्या शून्यावर आहे. पाच ते सहा महिने पुरेल एवढा मुबलक पाणीसाठा सारंखेडा बॅरेजमध्ये शिल्लक आहे तसेच शहरात नगरपालिकाद्वारे प्रत्येक वॉर्डमध्ये बोरवेलची सुविधा असून त्याद्वारेही नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो.

तळोदा शहरालाही पाण्याची टंचाई नाही. तापी नदीजवळील बोरवेलद्वारे तळोदा शहराला रोज ९०% पाणीपुरवठा केला जातो. तसेच या शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी तापी नदीवरील हातोडा फुलाजवळ शहराला पाणी पुरवण्यासाठी सोय करण्यात आली आहे. नवापूर शहरातील पाण्याची स्थिती मात्र चिंताजनक आहे. शहराला लागूनच रंगावली नदी वाहते. या नदीला यावर्षी पाणी आटल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. नवापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी रंगावली नदीवरच धरण बांधण्यात आले आहे. या धरणातून नवापूर शहराला पाणीपुरवठा केला जातो. धरणात जवळपास २२.५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

दुर्गम भागातील गावांना गाढवाद्वारे पाणीपुरवठा
जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत हे पाणी शहराला पुरेल अशी स्थिती आहे. शहरात पाणीपुरवठा सुरू असताना कमी दाबामुळे काही भागात पाणी पोहोचत नाही. त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातील प्रमुख शहरात काही ठिकाणी पाण्याची स्थिती चांगली आहे. तर काही ठिकाणी गंभीर आहे. परंतु सातपुड्यात यंदाच्या दुष्काळात पाणीटंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. प्रशासनाद्वारे काही ठिकाणी विंधन विहिरी व बोरवेलची सुविधा करून पाणीटंचाईवर मात करण्यात येत आहे. तर सातपुड्याच्या दुर्गम भागात काही गावांना गाढवाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

Intro:नंदुरबार जिल्ह्यात शहादा तळोदा नंदुरबार नवापूर या तालुक्यात नगरपालिकेत द्वारे पाणीपुरवठा केला जातो तर अक्कलकुवा धडगाव आणि ग्रामीण भागात जिल्हा परिषदेअंतर्गत पाण्याचे नियोजन केले जात
Body:नंदुरबार शहराला नगरपालिकेत द्वारे पाच किलोमीटरवर असलेल्या विरचक धरणातून पाणीपुरवठा केला जातो या धरणात सध्या स्थितीत 16.52 टक्के पाणी शिल्लक आहे अशी माहिती नंदुरबार नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली आहे नंदुरबार शहराला एका दिवसा आड पाणी पुरवठा केला जातो हा पुरवठा सकाळी फक्त अर्धा तास करण्यात येतो वीरचक धरणातील पाणीसाठा जून महिन्याच्या अखेरपर्यंत पुरेल असा अंदाज नगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे

शहादा शहराला तापी नदी वर बांधलेल्या सारंखेडा बॅरेजमधून पाणीपुरवठा केला जातो शहादा शहराला रोज पाणीपुरवठा केला जातो शहरात पाण्याची टंचाई नाही तसेच सारंखेडा बॅरेज मध्ये मुबलक पाणी असल्याने टँकरची संख्या शून्यावर आहे पाच ते सहा महिने पुरेल एवढा मुबलक पाणीसाठा सारंखेडा बॅरेज मध्ये आहे तसेच शहरात नगरपालिका द्वारे प्रत्येक वॉर्डमध्ये बोरवेल ची सुविधा आहे त्याद्वारे ही नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो आहे

Byte शहादा पाणी पुरवठा अधिकारी

तळोदा शहराला ही पाण्याची टंचाई नाही तापी नदी जवळील बोरवेल द्वारे तळोदा शहराला रोज 90% पाणीपुरवठा केला जातो आहे तसेच या शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी तापी नदीवरील हातोडा फुला जवळ थोडा शहराला पाणी पुरवण्यासाठी सोय करण्यात आली आहे

नवापूर शहरातील पाण्याची स्थिती मात्र चिंताजनक आहे शहराला लागूनच रंगावली नदी वाहते या नदीला यावर्षी पाणी आटल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे नवापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी रंगावली नदीवरच धरण बांधण्यात आले आहे या धरणातून नवापूर शहराला पाणीपुरवठा केला जातो धरणात जवळपास 22.5 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत हे पाणी शहराला पुरेल अशी स्थिती आहे शहरात पाणीपुरवठा सुरू असताना कमी दाबामुळे काही भागात पाणी पोहोचत नाही त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे पाण्याचा टँकर आला की घरातल्या सगळ्यांनाच चार हात करावे लागतात
Conclusion:जिल्ह्यातील प्रमुख शहरांत काही ठिकाणी पाण्याची स्थिती चांगली आहे तर काही ठिकाणी गंभीर आहे परंतु सातपुड्यात यंदाच्या दुष्काळात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे प्रशासनाद्वारे काही ठिकाणी विंधन विहिरी व बोरवेलची सुविधा करून पाणीटंचाईवर मात करण्यात येत आहे तर सातपुड्याच्या दुर्गम भागात काही गावांना गाढवा द्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.