नंदुरबार- कोरोना विषाणूबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी विविध प्रकारची शक्कल लढविली जात आहे. नागरिकांनी बाहेर पडू नये, म्हणून नंदुरबार पोलीस दलातील अशोक वारुळे यांनी एक सुंदरसे गीत स्वतः लिहून आणि ते गाऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.
अशोक वारुळे हे संचारबंदी काळात बंदोबस्तावर तैनात आहेत. लॉकडाऊन सुरू असतानाही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. त्यामुळे अशोक वारुळे यांनी आपल्या गीताद्वारे नागरिकांना आवाहन केले आहे. तसेच, या गीतातून पोलीस प्रशासनाला देखील प्रोत्साहित केले आहे.