ETV Bharat / state

नंदुरबारमध्ये बनवाट मद्य निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त, साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त - liquor factory demolished

नंदुरबार तालुक्यातील धुळवद शिवारात बनवाट मद्य निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त करुन दोन वाहनांसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने जप्त केला आहे. याप्रकरणी चौघा संशयीतांना ताब्यात घेण्यात आले असून मुख्य सूत्रधार मात्र फरार झाला आहे.

बनवाट मद्याच्या कारखाना उद्ध्वस्त
बनवाट मद्याच्या कारखाना उद्ध्वस्त
author img

By

Published : Jun 13, 2021, 5:04 PM IST

नंदुरबार - नंदुरबार तालुक्यातील धुळवद शिवारात बनवाट मद्याचा कारखाना उद्ध्वस्त करुन दोन वाहनांसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने जप्त केला आहे. याप्रकरणी चौघा संशयीतांना ताब्यात घेण्यात आले असून मुख्य सूत्रधार मात्र फरार झाला आहे.

नंदुरबारमध्ये बनवाट मद्य निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त, साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई
धुळवद शिवारात एका शेतात बनावट मद्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक युवराज राठोड यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने गुड्डू परदेशी यांच्या शेतामध्ये धाड टाकली. या शेतात बनावट मद्य निर्मितीचा कारखाना सुरू होता.

साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त
भरारी पथकाने बनावट विदेशी दारू बनविण्यासाठी लागणारे साहित्य, स्पिरीट 300 लिटर, बनावट विदेशी दारुचे नऊ बॉक्स, खाली बाटल्या, प्लॉस्टीक ड्रम, दोन वाहनांसह एकूण साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या बनवाट मद्याच्या कारखानाप्रकरणी चौघा संशयीतांना ताब्यात घेण्यात आले असून गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार पंकज चौधरी व शेतमालक गुड्डू परदेशी फारार झाले आहेत.

या पथकाने केली कारवाई
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त ओहोळ, अधीक्षक युवराज राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मनोज संबोधी, भरारी पथकाचे निरिक्षक बापू सुर्यवंशी, उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अर्जुन पटले, दुय्यम निरीक्षक प्रशांत पाटील, बबन चौथवे, जवान हेमंत पाटील, अजय रायते, हितेश जेठे, हर्षल नांद्रे, अविनाश पाटील, मानसिंग पाडवी यांनी सदर कारवाई केली. गुन्ह्याचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरिक्षक प्रशांत पाटील करित आहेत.

हेही वाचा - घाटकोपरमध्ये स्लॅब कोसळून कार बुडाली पाण्यात; पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.