नंदुरबार - विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने सर्व तयारी पुर्ण करण्यात आली आहे. नंदुरबार मधील जिल्हा प्रशासन निवडणुकांसाठी सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांनी स्पष्ट केले.
अक्कलकुवा मतदारसंघातील ९ मतदानकेंद्रांना गुजरातमार्गे बार्जद्वारे मतदान अधिकारी कर्मचारी पाठवले जाणार आहेत. जिल्ह्यातल्या चारही मतदारसंघ हे अनुसुचित जमातीसाठी राखीव आहेत. तब्बल १२ लाख २४ हजार ४२९ मतदार असणार आहेत. यासाठी १३८५ मतदान केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. या मतदान केंद्रांवर ८ हजार ३१० अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असतल्याची माहीती जिल्हाधिकाऱ्यानी दिली. यासाठी ११८ बसेस व २७४ जीप गाड्यांचा वापर केला जाणार आहे. लोकसभा निवडणुकांनंतर ९८०३ नविन मतदारांची नोंदणी झाली आहे. दोन्ही राज्यालगतच्या सीमांवर विशेष पथकाची नियुक्ती केली जाणार आहे.