ETV Bharat / state

नंदुरबार येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारूधंद्यांवर कारवाई - लोकसभा

गुजरात राज्यात दारूबंदी असल्याने नंदुरबार जिल्ह्यातील काही तालुक्यात मोठ्या प्रमाणात हातभट्टीची गावठी दारू तयार केली जाते. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यातील शहादा, तळोदा, अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यात अवैध दारु भट्ट्यांवर धाड टाकली.

अवैध दारुधंद्यावर कारवाई
author img

By

Published : Apr 6, 2019, 3:23 PM IST

नंदूरबार - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारूधंद्याचा आणि गावठी दारुच्या हातभट्ट्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने धडक कारवाई सत्र सुरू करण्यात आले आहे.

अवैध दारुधंद्यावर कारवाई करताना राज्य उत्पादन शुल्काचे अधिकारी

नंदुरबार जिल्हा गुजरात आणि मध्य प्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागात आहे. गुजरात राज्यात दारूबंदी असल्याने नंदुरबार जिल्ह्यातील काही तालुक्यात मोठ्या प्रमाणात हातभट्टीची गावठी दारू तयार केली जाते. जिल्ह्यासह गुजरात राज्यातही ही दारू पाठवले जाते. आदर्श आचारसंहितेप्रमाणे निवडणूक काळात दारूचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ शकतो. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यातील शहादा, तळोदा, अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यात अवैध दारु भट्ट्यांवर धाड टाकली.

दारू बनवण्यासाठी वापरण्यात येणारे जवळपास तीन लाख लिटर कच्चे रसायन नष्ट केले आणि तयार हातभट्टीची गावठी दारू नष्ट केली आहे. तसेच मध्यप्रदेशमध्ये बनावटीची विनापरवानगी दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करत ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. व्यावसायिकांच्या विरोधात सुरू करण्यात आलेल्या या धाडसत्रामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Intro:नंदूरबार, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारूधंद्यांचा आणि गावठी दारूच्या हातभट्ट्या वर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने धडक कारवाई सत्र सुरू करण्यात आले आहे, 
Body:नंदुरबार जिल्हा गुजरात आणि मध्य प्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागात आहे गुजरात राज्यात दारूबंदी असल्याने नंदुरबार जिल्ह्यातील काही तालुक्यात मोठ्या प्रमाणात हातभट्टीची गावठी दारू तयार केले जाते आणि ही दारू जिल्ह्याभरात सह गुजरात राज्यातही पाठवले जाते आदर्श आचारसंहितेचे प्रमाणे निवडणूक काळात दारूचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ शकतो म्हणून राज्य उत्पादन शुल्क विभागाने नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तळोदा अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यात अवैध दारु भट्ट्यांवर धाड टाकून दारू बनवण्यासाठी वापरण्यात येणारे कच्चे रसायन जवळपास तीन लाख लिटर नष्ट केले आहे आणि तयार हातभट्टीची गावठी दारू हे नष्ट केले आहे तसेच मध्यप्रदेश बनावटीची विनापरवानगी दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करत 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
Conclusion:व्यावसायिकांच्या विरोधात सुरू करण्यात आलेल्या या धाडसत्र मुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे ही कारवाई लोकसभा निवडणुकीपूर्वी हा देखावा ठरतात कायमस्वरूपी अशाप्रकारे कारवाया करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे...
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.