ETV Bharat / state

नंदुरबारमधील ऑक्सिजन सिस्टर संकल्पना ठरत आहे उपयुक्त

जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन सिस्टर ही संकल्पना राबवली जात आहे. प्रत्येक २० रुग्णांसाठी १ ऑक्सिजन सिस्टरची नियुक्ती करण्यात आली आहे. या नर्स प्रत्येक एक ते दोन तासात रुग्णालयातील २४० रुग्णांची ऑक्सिजन पातळी तपासतात. ऑक्सिजन पातळी पाहून ऑक्सिजन पुरवठा कमी असेल तर तो वाढवला जातो आणि जास्त असेल तर तो गरजे इतका केला जातो.

author img

By

Published : Apr 29, 2021, 4:34 PM IST

Updated : Apr 30, 2021, 3:51 PM IST

ऑक्सिजन सिस्टर संकल्पना
ऑक्सिजन सिस्टर संकल्पना

नंदुरबार - ऑक्सिजन सिस्टर ही संकल्पना आपण कधी ऐकलं नसेल मात्र, महाराष्ट्रातल्या नंदुरबार जिल्ह्याने संपूर्ण देशाला ऑक्सिजन सिस्टर ही संकल्पना दिली आहे. कोरोनाच्या महातांडव सध्या सुरू आहे. रुग्णालयातील कोरोना रुग्णांना तर प्रत्येक श्वासासाठी ऑक्सिजन गरजेचे झाले आहे. याच ऑक्सिजनच्या सुनियोजित वापराचे दुसरे नाव ऑक्सिजन सिस्टर आहे.

शोधली नामी शक्कल?

देशात सध्या नंदुरबार हा आदिवासी जिल्हा कोरोनाचा सामना करण्यासाठी आपल्या नव्या उपक्रमामुळे चर्चेत आहे. स्वतःचा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारल्यानंतर नंदुरबारमध्ये सुरू असलेली ऑक्सिजन सिस्टर ही संकल्पना राज्यात आदर्श ठरली आहे. ऑक्सिजन मिळविण्यासाठी कोरोना रुग्ण, त्यांचे नातेवाईक, रुग्णालय आणि डॉक्टर सर्वच त्रस्त आहेत. बेड आहेत तर ऑक्सिजन नाही अशी स्थिती अनेक ठिकाणी निर्माण झाली आहे. त्यामुळे आहे तो ऑक्सिजन जपून कसा वापरता येईल यावर नंदुरबार जिल्हा रुग्णालयाने नामी शक्कल शोधली आहे.

असा आहे पॅटर्न?

जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन सिस्टर ही संकल्पना राबवली जात आहे. प्रत्येक २० रुग्णांसाठी १ ऑक्सिजन सिस्टरची नियुक्ती करण्यात आली आहे. या नर्स प्रत्येक एक ते दोन तासात रुग्णालयातील २४० रुग्णांची ऑक्सिजन पातळी तपासतात. ऑक्सिजन पातळी पाहून ऑक्सिजन पुरवठा कमी असेल तर तो वाढवला जातो आणि जास्त असेल तर तो गरजे इतका केला जातो. रुग्णाने जेवताना अथवा अन्य विधीसाठी ऑक्सिजन मास्क काढला कि ऑक्सिजन सिस्टर त्या बेडचा ऑक्सिजन पुरवठा बंद करतात. रुग्ण आल्यावर पुन्हा ऑक्सिजन सुरळीत केले जाते.

उपचाराची योग्य दिशा मिळते

या ऑक्सिजन सिस्टरमुळे ऑक्सिजनची बचत होत असून गरजे इतकाच ऑक्सिजन पुरवठा होतो. रुग्णाच्या शारीरिक स्थितीची नोंदही वारंवार होत असल्याने उपचारासाठी योग्य दिशा मिळत असल्याचा दावा जिल्हा शल्य चिकित्सक रघुनाथ भोये यांनी केला आहे.

Last Updated : Apr 30, 2021, 3:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.