ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांनी 'हो' किंवा 'नाही' सांगावे, जरांगे पाटील यांचा निर्वाणीचा इशारा, मराठा आंदोलकांचा रस्ता रोको - JARANGE PATIL WARNING

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. आमच्या मागण्या मान्य करणार आहे की नाही हे दोनच शब्दात सांगावं असं ते म्हणालेत.

मनोज जरांगे पाटील
मनोज जरांगे पाटील (संग्रहित फोटो)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 29, 2025, 5:24 PM IST

Updated : Jan 29, 2025, 6:36 PM IST

जालना - मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करणार आहे की नाही हे मुख्यमंत्र्यांनी संध्याकाळ पर्यंत सांगून टाकावं असं अल्टिमेटम मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलंय. ते उपोषणस्थळी पत्रकारांशी बोलत होते. मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं आहे की त्यांनी मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण कराव्यात.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आम्हाला जीव जाळायला लावू नका. तुम्ही मागण्या पूर्ण करणार नसाल तर आम्ही उपोषण सोडून वेगळ्या मार्गानं आंदोलन करू. आम्हाला उपोषणाला बसावं लागेल असं वाटलं नव्हत, अशी खंतही जरांगे पाटील यांनी व्यक्त केली. तुम्ही मराठ्यांना सुखाने खाऊ दिलं नाही तर आम्ही तुम्हाला 5 वर्ष सुखाने खाऊ देणार नाही असा इशाराही जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला.

मनोज जरांगे पाटील (बातमीदार)

"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करणार आहे की नाही हे फक्त हो किंवा नाही या दोन शब्दात सांगून टाकावं. मुख्यमंत्री उलट्या काळजाचा दिसतो हे म्हण्याच्या आत तुम्ही आम्हाला मागण्या पूर्ण करणार आहे की नाही". - मनोज जरांगे पाटील

मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होतील असं वाटलं होतं. तसंच आम्हाला उपोषणाला बसावं लागेल असं वाटलं नव्हत अशी खंत देखील जरांगेंनी व्यक्त केलीय. तुम्ही मराठ्यांना सुखाने खाऊ दिलं नाही, तर आम्ही तुम्हाला 5 वर्ष सुखाने खाऊ देणार नाही असा इशारा देखील जरांगेंनी राज्य सरकारला दिला.

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असताना त्यांची प्रकृती ढासळत आहे. त्यामुळे जालना वडीगोद्री रस्त्यावर मराठा आंदोलकांनी आज आंदोलनही केलं. त्यांनी या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलं. आमच्या मागण्या मान्य करा अशा घोषणा यावेळी करण्यात आल्या.

हेही वाचा...

  1. "हा मजा घेण्याचा प्रश्न नाही"; जरांगेंच्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं उत्तर
  2. 'आता मागे हटणार नाही, मराठ्यांनी पुन्हा एकदा ताकद दाखवावी'; 25 जानेवारीपासून मनोज जरांगे उपसणार आंदोलनाचं हत्यार

Last Updated : Jan 29, 2025, 6:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.