ETV Bharat / entertainment

कपिल शर्मा शोमध्ये झळणारी अर्चना पूरण सिंग झाली शूटिंगदरम्यान जखमी, व्हिडिओ व्हायरल - ARCHANA PURAN SINGH INJURED

अभिनेत्री अर्चना पूरण सिंगबरोबर शूटिंग सेटवर एक अपघात झाला आहे. तिच्या हाताला आणि चेहऱ्याला दुखापत झाली आहे.

अर्चना पूरण सिंग
Archana Puran Singh (अर्चना पूरन सिंग (IMGAE/ Actress Vlog))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Jan 29, 2025, 5:21 PM IST

मुंबई: 'द ग्रेट इंडियन कपिल शो'ची जज अर्चना पूरण सिंगनं नुकताच सोशल मीडियावर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हे पाहून तिचे चाहते थक्क झाले आहेत. कारण सेटवर तिच्याबरोबर एक अपघात झाला, ज्यामुळे तिच्या मनगटाला आणि चेहऱ्याला दुखापत झाली आहे. यानंतर तिला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आलं. तसेच अर्चनावर शस्त्रक्रिया करण्यात आली. व्हिडिओ शेअर करताना अर्चना पूरण सिंगनं तिच्या पोस्टवर लिहिलं, 'जे काही घडते ते चांगल्यासाठीच घडते... मी यावर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. मी आता ठीक आहे, आणि नेहमीप्रमाणे सकारात्मक आहे. फक्त एका हातानं काहीही करणं किती कठीण आहे, हे आता समजत आहे.'

अर्चना पूरण सिंग झाली शूटिंग करताना जखमी : याशिवाय या घटनेचा एक व्हीलॉग यूट्यूबवर शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये तिनं संपूर्ण अपघाताची माहिती दिली आहे. राजकुमार राव स्टारर चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ही दुखापत झाली. अर्चना घसरल्यानं तिच्या हाताला आणि चेहऱ्याला लागल्यानं तिला शूटिंगसाठी जाण्यासाठी विलंब होतं आहे. तसेच तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. अर्चनानं तिच्या व्लॉगमध्ये, खुलासा केला की, तिनं राजकुमार रावला फोन करून प्रोडक्शनला झालेल्या विलंबाबद्दल माफी मागितली आणि टीमचे कोणतेही नुकसान होऊ नये, म्हणून ती लवकरच कामावर परत येईल असं आश्वासन तिनं दिलंय.

अर्चना पूरण सिंगचा मुलगा आर्यमनला वाटलं वाईट: व्हिडिओमध्ये अर्चनानं संपूर्ण घटनेबद्दल सांगितलं आणि तिच्या कुटुंबाच्या प्रतिक्रिया देखील दाखवल्या. तिचा मुलगा आयुष्माननं त्याचा भाऊ आर्यमनला अपघाताबद्दल सांगितलं. यानंतर आर्यमनला धक्का बसला. त्याच्या आईच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या आहेत, याबद्दल आर्यमनला खूप वाईट वाटलं. अर्चना तिच्या व्लॉगमध्ये रुग्णालयातून घरी परतण्याची तयारी करताना दिसत होती, तेव्हा तिचा पती परमीत देखील तिच्याबरोबर होता. अर्चना घरी परतली आणि तिनं सकारात्मक पद्धतीनं व्लॉग संपवला. आता ती लवकरच शूटिंग सेटवर परत जाणार असल्याचं देखील तिनं सांगितलं आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.