ETV Bharat / state

सातारा जिल्ह्यात अवैध शस्त्रांची तस्करी सुरूच, कराडमध्ये दोन पिस्तुलसह तीन जिवंत काडतुसे जप्त - ILLEGAL ARMS SMUGGLING

सातारा जिल्ह्यात अवैध शस्त्रांच्या तस्करीत वाढ झाली आहे. पंधरा दिवसात पोलिसांनी चार अवैध शस्त्रांबरोबरच काडतुसांसह पिस्तुल जप्त केली आहेत.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 29, 2025, 6:26 PM IST

सातारा - पिस्तुल विक्री आणि खरेदीसाठी आलेल्या तिघांना कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकानं सापळा रचून पकडलय. त्यांच्याकडून दोन पिस्तुल आणि तीन जिवंत काडतुसे, असा दीड लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय. या प्रकरणी तिघांवर संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश हिंदुराव चव्हाण (रा. कार्वेनाका, ता. कराड), तेजस भाऊ गुरव (रा. हजारमाची, ता. कराड) आणि जय लहूराज कणसे (रा. नवीपेठ मायणी, ता. खटाव) अशी संशयितांची नावं आहेत.

खबऱ्याच्या माहितीवरून पोलिसांची कारवाई - आक्या उर्फ आकाश चव्हाण हा पिस्तुल आणि काडतुसे विक्रीसाठी कार्वेनाका गोळेश्वर रस्त्यावर थांबला असल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली. त्या माहितीच्या आधारे कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशीलदार यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी सापळा रचला.

जप्त केलेली पिस्तुल आणि काडतुसं
जप्त केलेली पिस्तुल आणि काडतुसं (ETV Bharat Reporter)

काडतुसांसह पिस्तुल जप्त - शेतातील एका विहिरीजवळ थांबलेल्या संशयित आक्या चव्हाण याच्याजवळ दोघेजण आले. त्यांच्यात चर्चा सुरू असताना केशरी रंगाच्या पिशवीतील वस्तूंची देवाण-घेवाण झाली. त्याचवेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर आणि त्यांच्या पथकानं छापा मारून तिघांनाही ताब्यात घेतलं. त्यांची अंगझडती घेतली असता संशयित तेजस गुरवकडे सिल्वर रंगाचे पिस्तुल, जय कणसे याच्याकडे तीन जीवंत काडतुसे आणि आकाश चव्हाणकडे एक पिस्तुल सापडलं.

वाईमध्ये दोन शस्त्रे हस्तगत - मागील आठवड्यात वाई पोलिसांनी एका संशयिताकडून देशी बनावटीचं पिस्तुल आणि विदेशी बनावटीचं रिव्हॉल्व्हर जप्त केलं होतं. पंधरा दिवसात सातारा जिल्ह्यात चार शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. यावरून अवैध शस्त्रांची तस्करी वाढत असल्याचं स्पष्ट होतय. दरम्यान, नोव्हेंबर २०२२ पासून ते आजअखेर १११ देशी बनावटीची पिस्तुल, ४ बारा बोअर बंदुका, २ रायफल, २६० जीवंत काडतुसं, ३८४ रिकामी काडतुसं, ५ रिकामी मॅगझीन अशी शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

हेही वाचा..

  1. साताऱ्यात बिबट्याच्या शिकारीचा प्रयत्न फसला, कर्नाटकच्या पाच ऊसतोड मजुरांना अटक
  2. साताऱ्यात भरदिवसा झालेल्या गोळीबारात दोन गुंड जखमी, हल्लेखोरांपैकी एका संशयिताला पोलिसांनी घेतलं ताब्यात
  3. जमिनीच्या वादातून हवेत गोळीबार; संशयित माथेफिरूला अटक, पिस्तूल जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.