नंदुरबार - नंदुरबार तालुक्यातील नटावद येथील 31 वर्षीय युवक कोरोनाबाधित आढळला आहे. त्याच्या संपर्कातील कुटुंबीय व मित्रांसह 15 जणांना क्वारंटाईन करण्यात आले असून अन्य काहींचा शोध घेण्यात येत आहे. तसेच, गावात कंटेन्मेन्ट झोन जाहीर करण्यात आले असून प्रशासनाकडून गावात वेळोवेळी निर्जंतुकीकरण फवारणी केली जात आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. नंदुरबार तालुक्यातील नटावद येथील एका 31 वर्षीय युवकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे नटावद गावात खळबळ उडाली आहे. प्रशासनाने खबरदारी घेत बाधित युवकाच्या संपर्कातील त्याच्या कुटुंबीयांसह अन्य 15 जणांची माहिती घेऊन त्यांना क्वारंटाईन केले आहे. तसेच, क्वारंटाईन केलेल्या व्यक्तीने नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अन्य संपर्कातील व्यक्तींचाही शोध घेतला जात आहे.
नटावद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली. आरोग्य विभागाने पथक तयार केले असून घरोघरी जाऊन लोकांचे सर्वेक्षण केले जात आहे. प्रशासनाने नटावद येथे कंटेन्मेन्ट झोन जाहीर केला आहे. गावात वेळोवेळी निर्जंतुकीकरण फवारणी केली जात आहे. दरम्यान, हा कोरोनाबाधित युवक हा नंदुरबार शहरातील पहिल्या एका कोरोना बाधिताच्या संपर्कात आला होता. यामुळे प्रशासन खबरदारी घेत गावात विविध उपाययोजना राबवत आहे.