ETV Bharat / state

नवापूर शहराला पाणीपुरवठा करणारे धरण ओव्हरफ्लो; नदी किनाऱ्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा - अतिवृष्टी

गेल्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. परिणामी धरणातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणावर वाढल्याने नदी किनार्‍यावरील गावांना धोक्याचा इशारा वर्तविण्यात येत आहे.

नवापूर शहराला पाणीपुरवठा करणारे धरण ओवरफ्लो
author img

By

Published : Aug 3, 2019, 8:22 PM IST

नंदुरबार - नवापूर शहराला यंदाच्या दुष्काळात पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली होती. पाणीटंचाईमुळे नवापूर शहरातील राजकारण चांगलेच तापले होते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. परिणामी धरणातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणावर वाढल्याने नदी किनार्‍यावरील गावांना धोक्याचा इशारा वर्तविण्यात येत आहे.

नवापूर शहराला पाणीपुरवठा करणारे धरण ओवरफ्लो

काही दिवसांपासून धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर असल्यामुळे या धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. तर शहराला पाणीपुरवठा करणारी रंगावली नदीवरील नागझिरी धरण ओवरफ्लो झाले आहे. पुढचे काही दिवस पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

मागील वर्षी १७ ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीत रंगावली नदीला अचानक महापूर आला होता. या पुरामुळे रंगावली किनाऱ्यालगत असलेल्या गावांना पुराचा मोठा फटका बसला होता. दरम्यान, आता नागझिरी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करून नदीकिनाऱ्याजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्याची आवश्यकता आहे.

Intro:Anchor :- नवापूर शहराला यंदाच्या दुष्काळात पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली होती पाणीटंचाईमुळे नागपूर शहरातील राजकारण हे चांगलंच तापलं होतं परंतु नवापुर तालुक्यात गेल्या काही दिवासांपासून धरण क्षेत्रांमध्ये पावसाचा जोर कायम असल्याने नवापूरकरासाठी खुशखबर असून शहराला पाणीपुरवठा करणारी रंगावली नदीवरील नागझिरी धरण पूर्ण क्षमतेने भरल आहे. परिणामी धरणांतील पाणीसाठा मोठ्या प्रमाणावर वाढल्याने नदी किनार्‍यावरील गावांना सतर्कतेचा इशारा वर्तविण्यात येत आहे.

Body:काही दिवसांपासून धरण क्षेत्रांमध्ये पावसाचा जोर असल्यामुळे या धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली रंगावली नदीवरील नागझिरी धरण ओवर फ्लो झाले आहे. पुढचे काही दिवस पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी १७ ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीत रंगावली नदीला अचानक महापूर आल्याने रंगावली किनाऱ्यालगत असलेल्या गावांना पुराचा मोठा फटका बसला होता. Conclusion:प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करून नदीकिनारी जवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्याची आवश्यकता आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.