नंदुरबार - गुजरात पासिंगच्या कारमध्ये सुरत येथील एकाचा मृतदेह आढळुन आल्याने नवापूर शहरात खळबळ उडाली आहे. या व्यक्तीच्या तोंड प्लॅस्टिकच्या टेपने बांधुन धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहे. या व्यक्तीची हत्या केल्यानंतर मृतदेह कारच्या मागील बाजुस टाकण्यात आला. दरम्यान, रात्री उशिरा मृताची व्यक्तीची ओळख पटविण्यात आली आहे. मृत भावेश मेहता यांचे कुटुंबीय रात्री उशिरा नवापूरात दाखल झाले.
सुरत येथील भावेश मेहता नामक व्यक्ती नवापूर नजिक कारमध्ये मृतावस्थेत आढळुन आल्याने विविध तर्कवितर्क लावले जात आहे. नवापूर पोलिसांनी दखल घेत घटनास्थळी तपासणी केली असून तपास सुरू आहे.
हेही वाचा - कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून 2100 क्युसेक पाण्याचा होणार विसर्ग
मृताच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार -
नवापूर शहरातील टेलिफोन एक्सचेंज कार्यालयाजवळील महामार्गावर सियाज असलेली तपकिरी रंगाची कार बेवारसरित्या उभी आढळुन आली. गुजरात पासिंग असलेली कार महामार्गाच्या मध्यभागी उभी आढळुन आल्याने प्रत्यक्षदर्शींनी लागलीच नवापूर पोलिसांनी कळविले. घटनास्थळी नवापूर पोलिसांनी दाखल होत गुजरात पासिंग असलेली कारची (क्र.जी.जे.05 टी.सी.0017) तपासणी केली. या कारच्या मागील सीटवर सुरत येथील भावेश मेहता या 45 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळुन आला. भावेश मेहता याच्या तोंडाला प्लॅस्टिकच्या टेपने बांधण्यात आले असल्याने त्याच्या शरीरासह हाता-पायावर धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसुन आले.
नवापूर पोलिसांकडून तपास सुरू -
यामुळे पोलिसांनी घटनेचे गांभीर्य घेत तपासणी केली असता काहीही निष्पन्न झाले नाही. मात्र, भावेश मेहता यांचा घातपातातुन खुन केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. कार कोणाची आहे? याचाही शोध पोलीस घेत असून तपास सुरू आहे.
हेही वाचा - नामांकित दूध कंपन्यांच्या पिशवीमध्ये भेसळ, १८० लिटर भेसळयुक्त दूध जप्त