ETV Bharat / state

गुजरातमधून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची राज्याच्या सीमेवर वैद्यकीय तपासणी - Nandurbar corona update news

कुठल्याही प्रवासात कोरोनासदृष्ट लक्षणे आढळून आल्यास त्यांना नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

नंदुरबार कोरोना
author img

By

Published : Feb 27, 2021, 6:52 PM IST

Updated : Feb 27, 2021, 7:15 PM IST

नंदुरबार - नंदुरबार जिल्हा गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागात वसलेला आहे. गुजरात राज्यातून महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर प्रवासी येत असतात. महाराष्ट्रात कोरोनारुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महाराष्ट्राच्या सीमेवर येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी नवापूर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत केली जात असते. कुठल्याही प्रवासात कोरोनासदृष्ट लक्षणे आढळून आल्यास त्यांना नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

गुजरात राज्यातून येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी

गुजरात राज्यातून येणाऱ्या प्रत्येक वाहनाची महाराष्ट्रातील वैद्यकीय पथकाकडून तपासणी करण्यात येते. त्याचबरोबर वाहनातील प्रत्येक व्यक्तीची थर्मल स्कॅनिंग ऑक्सीमीटर तपासणी करण्यात येते. कोरोनासदृश्य लक्षणे आढळून आल्यास त्यांची rt-pcr टेस्ट करण्यात येते, अशी माहिती नवापूर तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली.

सीमावर्ती भागात वैद्यकीय पथक तैनात

नंदुरबार जिल्ह्यापासून अवघ्या काही अंतरावर गुजरात राज्याची सीमा आहे. त्याचबरोबर महामार्ग क्रमांक सहावर मोठ्या प्रमाणावर वाहने येत असतात. वाहनांमधील प्रत्येक व्यक्तीची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुढे सोडण्यात येत असते.

गुजरात राज्यातून येणाऱ्या बसेस बंद

महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे पाहून गुजरात राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व बसेस बंद करण्यात आल्या असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे गुजरातमधून बसेसद्वारे प्रवासी येणार नाहीत व त्यामुळे कोरोनासंसर्ग रोखता येईल. यामुळे ही बससेवा बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

Last Updated : Feb 27, 2021, 7:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.