नंदुरबार- महाराष्ट्र दिनानिमित्त नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आला.
हेही वाचा- मुंबईत कोरोनाचे आज 417 नवे रुग्ण; 20 जणांचा मृत्यू तर एकूण रुग्ण संख्या 6874 वर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा ध्वजारोहण सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने संपन्न झाला. अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत योग्य ते अंतर ठेवत ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम पार पडला. दरवर्षी होणाऱ्या सांस्कृतिक आणि विविध कार्यक्रमांना तसेच बक्षिस वितरणाच्या कार्यक्रमाला यावर्षी स्थगिती देण्यात आली होती.
जिल्ह्यातही 60 व्या महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम सर्वत्र अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला आहे. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.