ETV Bharat / state

कोरोना व्हायरस : उत्तर महाराष्ट्रात नंदुरबारमध्ये सर्वात कमी रुग्ण - nandurbar latest news

नंदुरबार कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. जिल्ह्यात आदिवासी बहुल भाग असून याठिकाणी मर्यादित आरोग्य सुविधा आणि यंत्रणा आहे. त्यातच परराज्यातून आणि इतर मोठ्या शहरातून आलेल्या नागरिकांची संख्या ६० हजारांच्या जवळपास आहे.

lowest-number-of-corona-patients-in-nandurbar-in-north-maharashtra
उत्तर महाराष्ट्रात नंदुरबारमध्ये सर्वात कमी रुग्ण...
author img

By

Published : Jun 10, 2020, 1:23 PM IST

नंदुरबार- उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्हा वगळता सर्वच जिल्ह्यांनी कोरोना रुग्णांची शंभरी पार केली आहे. नंदुरबार जिल्हा प्रशासनाचे उत्कृष्ट नियोजन, पोलिसांचे काम यामुळे जिल्ह्यात कोरोना रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे.

२८ जणांनी कोरोनावर मात...

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या उत्तर महाराष्ट्रातील इरत जिल्ह्याच्या तुलनेत कमी आहे. जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची सख्या १ हजारापर्यंत पोहोचली आहे. धुळे जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत ३७ कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी २८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर तिघांचा मृत्यू झाला आहे. तर ६ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

उत्तर महाराष्ट्रात नंदुरबारमध्ये सर्वात कमी रुग्ण...

नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी...
जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळल्यावर सर्वात पहिल्यांदा तो परिसर सील करुन निर्जंतुकीकरण करण्यात येतो. संबंधित भागात असलेल्या नागरिकांची घरोघरी जाऊन आरोग्य कर्मचारी, आशा सेविकांकडून तपासणी केली जाते. यामुळे कोरोना रुग्णांची साखळी खंडित करण्यात यश येत मिळत आहे. नागरिकही कोरोनाबाबत जागृत झाले आहेत. ग्रामीण भागात रुग्ण आढळ्यानंतर तेथील ग्रामपंचायत स्वयंघोषित जनता कर्फ्यू लावतात. यामुळे जिल्हात कोरोनाचा प्रसार रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे.

पोलीस दलाची महत्वाची भूमिका...

आरोग्य कर्मचारी आणि पोलीस दलाचीही भूमिका महत्वाची आहे. पोलीस दलाच्या वतीने हजारो वाहनांवर लॉकडाऊनच्या काळात कारवाई केली आहे. जवळपास 200 च्या वर नागरिकांवर कारवाई झाली आहे. त्यामुळे नागरिकांध्ये शिस्त लागली आणि कोरोनाचा प्रसार रोखता आला.

कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल...
नंदुरबार कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. जिल्हा आदिवासी बहुल भाग असून याठीकाणी मर्यादित आरोग्य सुविधा आणि यंत्रणा आहे. त्यातच परराज्यातून आणि इतर मोठ्या शहरातून आलेल्या नागरिकांची संख्या ६० हजारांच्या जवळपास आहे. मात्र, तरीही येथील जिल्हा प्रशासन कोरोनाशी योग्य पद्धतीलने लढा देत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.