नंदुरबार - आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आशा सेविका आणि गटप्रवर्तक यांनी जिल्हा परिषदसमोर आंदोलन करीत स्वतःला अटक करून घेत जेलभरो आंदोलन केले. मानधनात वाढ करावी त्यासोबत इतर सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी गेल्या आठवडाभरापासून आशा सेविकांनी विविध टप्प्यात वेगवेगळी आंदोलने केली.
हेही वाचा - डोंबिवली एमआयडीसीतील केमिकल कंपनीला आग; 1 जखमी
मात्र, सरकारला आशा सेविका आणि गटप्रवर्तक यांच्या आंदोलनाची दखल घेण्यास वेळ नसल्याने जेलभरो सारखे तीव्र आंदोलन करण्याची वेळ आल्याचा आरोप आशा सेविका संघटनेच्यावतीने करण्यात आला. या आंदोलनात जिल्हाभरातून हजारो आशा सेविका आणि गटप्रवर्तक यांनी सहभागी होऊन स्वतःला अटक करून घेतली.