ETV Bharat / state

उपप्रादेशिक कार्यालयातर्फे विशेष मोहिमेअंतर्गत वाहनांची तपासणी - नंदुरबार आरटीओ लेटेस्ट न्यूज

राज्याच्या परिवहन आयुक्तांच्या आदेशावरून संपूर्ण महाराष्ट्रात विशेष तपासणी मोहीम राबवली जात आहे. प्रवासी बसेस, ओव्हरलोड धावणाऱ्या गाड्या, अवैधरित्या चालणारे ट्रक-डंपर, प्राणी क्लेश संदर्भातील वाहने यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. अशा पद्धतीच्या कारवाया नंदुरबार जिल्ह्यातदेखील करण्यात आल्या आहेत.

नंदुरबार वाहन तपासणी न्यूज
नंदुरबार वाहन तपासणी न्यूज
author img

By

Published : Dec 25, 2020, 6:03 PM IST

Updated : Dec 25, 2020, 7:15 PM IST

नंदुरबार - जिल्ह्यात अवैधरीत्या सुरू असलेल्या वाहतुकीसाठी विशेष तपासणी मोहीम राबवली जात आहे. यात विशेषतः अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या डंपर व लक्झरी वाहनांची तपासणी केली जात आहे.

उपप्रादेशिक कार्यालयातर्फे विशेष मोहिमेअंतर्गत वाहनांची तपासणी

परिवहन विभागातर्फे विशेष मोहीम

राज्याच्या परिवहन आयुक्तांच्या आदेशावरून संपूर्ण महाराष्ट्रात विशेष तपासणी मोहीम राबवली जात आहे. प्रवासी बसेस, ओव्हरलोड धावणाऱ्या गाड्या, अवैधरित्या चालणारे ट्रक-डंपर, प्राणी क्लेश संदर्भातील वाहने यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. अशा पद्धतीच्या कारवाया नंदुरबार जिल्ह्यातदेखील करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा - लोकांच्या संपर्कातील २ लाख 'हायरिस्क' लोकांच्या कोरोना चाचण्या, १६०० पॉझिटिव्ह

32 वाहनांची तपासणी

जिल्ह्यात या तपासणीअंतर्गत प्राणी-क्लेश कायद्याअंतर्गत एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 25 (इ) प्रमाणे नंदुरबार शहर पोलीस स्थानकात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे साधारणत: नऊ बसेस व बावीस ट्रक यांच्यावरदेखील ही कारवाई करण्यात आली आहे. अशा एकूण 32 वाहनांनावर या विशेष तपासणी मोहिमेदरम्यान उपप्रादेशिक कार्यालय नंदुरबार व जिल्ह्यातील इतर पोलीस स्टेशनमध्ये कारवाया करत वाहने जमा करण्यात आली आहे.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे आवाहन

नंदुरबार जिल्हा उपप्रादेशिक कार्यालयाकडून जनतेला आवाहन करण्यात आले. वाहनधारकांनी कर भरणा करून घ्यावा, कागदपत्रे अद्ययावत करून घ्यावीत, जेणेकरून वाहनधारकांचा वेळ जाणार नाही असे सांगण्यात आले आहे. प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नाना बच्छाव यांनी केले आहे.

हेही वाचा - गुलाबी थंडीची चाहूल लागताच महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची गर्दी

Last Updated : Dec 25, 2020, 7:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.