नंदुरबार - आदिवासी विकास एकात्मिक प्रकल्प कार्यालय नंदुरबार यांच्या अंतर्गत प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल खामगाव नंदुरबार येथे करण्यात आले. यावेळी आश्रमशाळेतील ९७५ विद्यार्थ्यांनी विविध खेळात भाग घेतला. स्पर्धांचे उद्घाटन नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी केले.
हेही वाचा - अजिंक्य रहाणेला पडलं 'गुलाबी' स्वप्नं...
या प्रकल्पस्तरीय स्पर्धेत नवापूर नंदुरबार व शहादा तालुक्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील ९७५ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. यात व्हॉलीबॉल, हॅण्डबॉल, कबड्डी, खो-खो हे सांघिक खेळ व वैयक्तिक खेळात १००, ४००, ८००, १५००, ३००० मीटर धावणे, रिले, गोळाफेक, भालाफेक, थाळीफेक, उंच उडी, लांब उडी आदी क्रीडा प्रकार घेण्यात आले. स्पर्धांमध्ये एकूण ७२ संघाचा समावेश करण्यात आला.
नंदुरबार तीन दिवसीय प्रकल्पस्तरीय क्रीडा उद्घाटन क्रीडा स्पर्धेत खेळाडूंची शारिरीक, मानसिक, बौध्दिक प्रगती होत असते. स्पर्धेत मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभागी झाले पहिजे. क्रीडा क्षेत्रात वावरताना नेहमी जय-पराजयाचा सामना करावा लागतो, त्यामुळे एका विजयाने भारावून जाऊ नये किंवा दुसर्या ने पराजयाने खचू नये. नेहमी सातत्य ठेवून आयुष्याचे अंतिम ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. आश्रमशाळेत विद्यार्थ्यांनी क्रीडा जागतिक पातळीवर नाव मोठे करावे, असे मत उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद भारूड यांनी व्यक्त केले.