ETV Bharat / state

चेतक फेस्टिवलमध्ये अश्व नृत्य स्पर्धा; १०० हून अधिक घोड्यांचा डोळ्याचे पारणे फेडणारा नृत्याविष्कार - chetak festival 2019

सारंगखेडा येथील चेतक फेस्टिवल घोड्यांसाठी प्रसिद्ध आहे. या यात्रोत्सवात घोड्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री होत असते, यातलाच एक भाग घोड्यांचे नृत्य आहे. देशभरातील कानाकोपऱ्यातून आलेल्या अश्वांनी या स्पर्धेत मनमोहून टाकणारे नृत्य सादर केले.

nandurbar
चेतक फेस्टिवल
author img

By

Published : Dec 25, 2019, 9:44 AM IST

Updated : Dec 25, 2019, 3:18 PM IST

नंदुरबार - एखद्या नृत्यांगनेला किंवा अप्सरेला लाजवेल असे एकपेक्षा एक सरस नृत्य सारंगखेडा येथील चेतक फेस्टिव्हल मधील अश्व नृत्य स्पर्धेत पाहण्यास मिळत आहेत. देशभरातील कानाकोपऱ्यातून आलेल्या अश्वांनी या स्पर्धेत मनमोहून टाकणारे नृत्य सादर केले.

अश्व नृत्य स्पर्धा

सारंगखेडा येथील चेतक फेस्टिवल घोड्यांसाठी प्रसिद्ध आहे. या यात्रोत्सवात घोड्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री होत असते, यातलाच एक भाग घोड्यांचे नृत्य आहे. कधी डफाचा ताल तर कधी राजस्थानी वाद्य संगीत तर कधी पंजाबी भांगडा तर मध्येच हलगीचा लय अशा विविध तालांवर चेतक फेस्टिव्हलमधील अश्व नृत्य स्पर्धेत घोड्यांचे नाचकाम सुरू होते. कुणी बाजेवर तर कुणी चौरंगावर कुणी चारचाकी गाडीवर तर कुणा एका घोड्याने बुलेटवर उभे राहून नृत्य सादर केले. तर, सर्वात अधिक लक्ष वेधून घेतल ते विना लगाम नृत्य करणाऱ्या घोड्यांनी कारण, विना लगाम घोडा नियंत्रण करणे शक्य नाही. असे असतांना काही घोड्यांनी फक्त आपल्या प्रशिक्षकांच्या इशाऱ्यावर नृत्य सादर केले. त्यामुळे ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेल्या अश्व शौकीनांच्या डोळ्याचे पारणे फिटले.

हेही वाचा - अवैधरीत्या धान्य वाहतूक करणारा ट्रक जप्त

चेतक फेस्टिव्हल मध्ये झालेल्या अश्व नृत्य स्पर्धेत विजयी घोड्यांना लाखोंचे बक्षिसे देण्यात आले. या स्पर्धेसाठी एकूण १०० अश्वांनी सहभाग नोंदविला होता. त्यात पहिला क्रमांक राजस्थान येथील विजय जोशी यांच्या 'बादल' या घोड्याला मिळाला तर दुसरा नंबर सातारा येथील किरण माने यांच्या 'चेतक'ला तर तिसरे बक्षीस विटा सांगली येथील 'राजा'ने मिळवले. ही अश्व नृत्य सौंदर्य स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली. यात पुढील वर्षापासून पर्यटकांसाठी ही स्पर्धा ३ दिवस ठेवण्यात येणार असल्याची माहिती आयोजक जयपालसिंह रावल यांनी दिली.

हेही वाचा - चेतक फेस्टिवलमध्ये 12 दिवसात साडेतीन कोटींची उलाढाल, नव्या विक्रमाची शक्यता

Intro:नंदुरबार - एखद्या नृत्यागानाला किंवा अप्सरेला लाजवेल असा एकपेक्षा एक सरस नृत्य सारंगखेडा येथील चेतक फेस्टिव्हल मधील अश्व नृत्य स्पर्धेत पाहण्यास मिळत आहे. देशभरच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अश्वांनी या स्पर्धेत मनमोहून टाकणारे नृत्य सादर केलेत या वर एक खास रिपोर्ट....
Body:सारंगखेडाखेड येथील चेतक फेस्टिवल घोड्यांसाठी प्रसिद्ध आहे. यात्रोत्सवात घोड्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री होते यातला एक भाग घोड्यांचे नृत्य आहे. कधी डफाचा ताल तर कधी राजस्थानी वाद्य संगीत तर कधी पंजाबी भांगडा तर मध्येच हलगीचा लय अश्या विविध तालावर चेतक फेस्टिव्हल मधील अश्व नृत्य स्पर्धेत घोड्याचे नाचकाम सुरु होते. कुणी बाजेवर तर कुणी चौरंगावर कुणी चारचाकी गाडीवर तर कुणा एका घोड्याने बुलेट वर उभा राहून नृत्य सादर केलेत तर सर्वात अधिक लक्ष वेधून घेतल ते विना लगाम नृत्य करणाऱ्या घोड्यांनी कारण विना लगाम घोडा नियंत्रण करण शक्य नाही अस असतांना काही घोड्यांनी फक्त आपल्या प्रशिक्षकांच्या इशाऱ्यावर नृत्य सादर केले. त्यामुळे हि स्पर्धा पाहण्यासाठी आलेल्या अश्व शौकीनांच्या डोळ्याचे पारणे फिटले...
चेतक फेस्टिव्हल मध्ये झालेल्या अश्व नृत्य स्पर्धेत विजयी घोड्यांना लाखोंचे बक्षिसे देण्यात आली. या स्पर्धेसाठी एकूण १०० अश्वांनी सहभाग नोंदविला होता. त्यात पहिला क्रमांक राजस्थान येथील विजय जोशी यांच्या बादल या घोड्याला मिळाला तर दुसरा नंबर सातारा येथील किरण माने यांच्या चेतक ला तर तिसरे बक्षीस विटा सांगलीव येथील राजाने मिळवला. हि अश्व नृत्य सौंदर्य स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली. यात पुढील वर्षापासून पर्यटकांसाठी हि स्पर्धा तीन दिवस होणार असल्याची माहिती आयोजक जयपालसिंह रावल यांनी दिली.

आपल्याला अश्वांच्या नृत्य आदा पहायच्या असतील तर आपल्याला पुढील वर्षी सारंगखेडा येथील चेतक फेस्टिव्हल ला भेट द्यावी आणि एका वेगळ्या अनुभव घ्यावा...

byte - जयपालसिंह रावल
आयोजक - चेतक फेस्टिव्हल, सारंगखेडाConclusion:byte - जयपालसिंह रावल
आयोजक - चेतक फेस्टिव्हल, सारंगखेडा
Last Updated : Dec 25, 2019, 3:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.