नंदुरबार - जिल्ह्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात नंदुरबार व शहादा येथे सावित्रीबाईंच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. त्याचबरोबर विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांचा आजची सावित्री म्हणून सन्मान करण्यात आला व आदर्श शिक्षिका व शिक्षक पुरस्कार देखील वितरित करण्यात आले.
सावित्रीबाई व महात्मा फुले यांना अभिवादन -
नंदुरबार येथील माळीवाडा परिसरात असलेल्या सावित्रीबाई व महात्मा फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्याला संस्थेच्या वतीने व समाजाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी शहरातील व परिसरातील नागरिकांनी यावेळी अभिवादन केले.
सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महिलांचा सन्मान सावित्रीबाईंच्या जयंतीदिनी महिलांचा सन्मान -आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नंदुरबार येथील महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचालित स्वामी विवेकानंद हायस्कूल तर्फे परिसरातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. यात नंदुरबार नगरपालिकेच्या नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी, सहाय्यक जिल्हाधिकारी वसुमना पंथ, नंदुरबार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सीमा वळवी त्याचबरोबर परिसरात वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टर शिका चिंकारा यांचा सन्मान करण्यात आला.
संस्थेतर्फे शिक्षिका व शिक्षकांना आदर्श पुरस्कार -आदर्श शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त संस्थेतर्फे दरवर्षी शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येत असतो. याप्रसंगी संस्थेतर्फे उत्कृष्ट शिक्षक म्हणून मुख्याध्यापक एन. जी. भावसार, निंबा माळी व मनीषा गवळी यांना संस्थेतर्फे आदर्श शिक्षक व शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.