ETV Bharat / state

पालकमंत्री के.सी. पाडवी यांची जिल्हा रुग्णालयाला भेट - नंदुरबार जिल्हा न्यूज अपडेट

जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ होत आहे. तसेच जिल्हा रुग्णालयात रुग्णांवर होणाऱ्या उपचाराबाबत तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर बुधवारी पालकमंत्री के.सी.पाडवी यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी कोरोनाबाधित रुग्णांवर कशापद्धतीने उपचार होत आहेत, त्यांना कोणत्या सुविधा देण्यात आल्या आहेत याबाबत माहिती जाणून घेतली.

पालकमंत्री के.सी. पाडवी यांची जिल्हा रुग्णालयाला भेट

author img

By

Published : Apr 14, 2021, 7:05 PM IST

नंदुरबार - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ होत आहे. तसेच जिल्हा रुग्णालयात रुग्णांवर होणाऱ्या उपचाराबाबत तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर बुधवारी पालकमंत्री के.सी.पाडवी यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी कोरोनाबाधित रुग्णांवर कशापद्धतीने उपचार होत आहेत, त्यांना कोणत्या सुविधा देण्यात आल्या आहेत याबाबत माहिती जाणून घेतली. तसेच त्यांनी कोरोनाबाधित रुग्णांशी संवाद देखील साधला. के. सी. पाडवी यांनी यावेळी पीपीई कीट घालून रुग्णांशी संवाद साधला.

दरम्यान कोरोनाबाधितांना चांगल्या सुविधा देण्यात याव्यात, कोरोना संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेता अधिक सुविधा निर्माण कराव्यात, रुग्णांवर योग्य ते उपचार करावेत, अशा सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या. पाडवी यांनी यावेळी रुग्णांशी संवाद साधत, कोरोनामुळे घाबरून जावू नका, डॉक्टरांच्या सूचनेनुसार उपचार घ्या असे आवाहन देखील त्यांनी यावेळी रुग्णांना केले.

पालकमंत्र्यांसोबत अधिकाऱ्यांनीही दिली रुग्णालयाला भेट

जिल्हा रुग्णालयातील कोविड वार्डात पालकमंत्री के. सी. पाडवी यांनी भेट दिली. याप्रसंगी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. के.डी.सातपुते, डॉ.राजेश वसावे यांची उपस्थिती होती.

पालकमंत्र्यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी यांनी जिल्हा शासकीय रुग्णलयात कोरोना लसीची दुसरी मात्रा (डोस) घेतली. परिचारिका सुनयना पाथरे यांनी ही लस दिली. पालकमंत्र्यांनी सुनयना यांचे आभार मानले आणि त्यांच्या कामाचे कौतुक केले. कोरोना लस पुर्णपणे सुरक्षीत असून 45 वर्षांवरील नागरिकांनी जवळच्या लसीकरण केंद्रावर जावून लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

हेही वाचा - रेमडेसिविर पुरवठ्याबाबत आता नियंत्रण कक्षाकडे कंट्रोल; रुग्णांच्या नातेवाईकांना दिलासा तर स्टॉकीस्टवरही लक्ष

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.