ETV Bharat / state

नंदुरबार जिल्ह्यात मिरची लागवडीच्या क्षेत्रात वाढ; मिरची लागवडीला आला वेग - नंदुरबार मिरची लागवड न्यूज

गेल्या काही वर्षांपासून मिरची उत्पादक शेतकरी पपई या पिकाकडे वळला होता. परंतु, पपई पिकाच्या खरेदी -विक्रीमध्ये व्यापाऱ्यांची सुरू असलेली मनमानी आणि यावर्षी लॉकडाऊनमुळे पपई उत्पादकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी काढण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा मिरची लागवडीकडे वळला

नंदुरबार जिल्ह्यात मिरची लागवडीच्या क्षेत्रात वाढ

author img

By

Published : Jul 1, 2020, 11:44 AM IST

नंदुरबार - जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने मिरची लागवडीला वेग आला आहे. यावर्षी लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात पपई उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसल्याने शेतकरी पुन्हा मिरची लागवडीकडे वळला आहे. त्यामुळे यंदा मिरचीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.

नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड केली जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून मिरची उत्पादक शेतकरी पपई या पिकाकडे वळला होता. परंतु, पपई पिकाच्या खरेदी विक्रीमध्ये व्यापाऱ्यांची सुरू असलेली मनमानी आणि यावर्षी लॉकडाऊनमुळे पपई उत्पादकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी काढण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा मिरची लागवडीकडे वळला आहे. कृषी विभागाकडील नोंदीनुसार यंदा मिरची लागवडीचे क्षेत्र वाढण्याचा अंदाजही कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

नंदुरबार जिल्ह्यात मिरची लागवडीच्या क्षेत्रात वाढ; मिरची लागवडीला आला वेग

दरवर्षी शेतकरी पारंपरिक पद्धतीने मिरची लागवड करत असतात. मात्र यावर्षी आधुनिक पध्दतीचा अवलंब शेतकऱ्यांनी केला असून मचिंग पेपरचा वापर करत मिरची लागवडीला सुरुवात केली आहे. यावर्षी लॉकडाऊन मुळे शेतकऱ्यांना मिरची रोप उशिरा उपलब्ध झाल्याने लागवडीला उशिरा सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर पाऊस देखील दोन आठवडे उशिराने मिरची लागवड यंदा उशिराने झाली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.