नंदुरबार - जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने पिकांची परिस्थिती चांगली आहे. त्यामुळे खरीप हंगामामध्ये चांगले उत्पन्न येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे उत्पादन चांगले येण्याचा अंदाज असल्याने सर्व 857 खरीप गावांची पैसेवारी ही 50 पैश्यांपेक्षा अधिक असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
हेही वाचा - नंदूरबारमध्ये मनसेचे अनोखे आंदोलन.. रस्त्यावरील खड्ड्यात केले मुंडन
जिल्ह्यात आतार्पंयत सरासरीच्या 108 टक्के पाऊस पडला आहे. पावसामुळे पेरणी झालेल्या 2 लाख 88 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांची स्थिती मजबूत झाली होती. या पिकांचा अंदाज घेत महसूल प्रशासनाने गावनिहाय पैसेवारी जाहीर केली आहे. यानुसार जिल्ह्यातील 857 खरीप आणि 30 खरीप गावांमधील स्थिती चांगली असल्याचे दिसून आल्यानंतर या गावांची पैसेवारी 50 पैश्यांपेक्षा अधिक आहे.
हेही वाचा - नर्मदा बचाव आंदोलन कार्यकर्त्यांची नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
तर यातील काही गावांची स्थिती मजबूत असून त्यांची पैसेवारी 70 पैश्यांर्पयत गेल्याची माहिती देण्यात आली आहे. प्रशासनाचा हा प्राथमिक अंदाज असला तरी, गेल्या 3 वर्षानंतर शेती क्षेत्रासाठी हा दिलासादायक असाच अंदाज आहे.