नंदुरबार - शहरातील एका कलाकाराने तब्बल ५६ तासांच्या अथक परिश्रमानंतर गणेशचतुर्थीनिमित्त लालबागच्या राजाची 4×6 फुटाची रांगोळी रेखाटली आहे. नंदुरबारमधील शहरातील प्रसिद्ध गणपती मंदिरात सदर रांगोळी प्रदर्शित करण्यात आली.
56 तासात रेखाटली रांगोळी
नंदुरबार शहरातील गौरव माळी या विद्यार्थ्यांला ही रांगोळी रेखाटण्यासाठी ५६ तास एवढा अवधी लागला. त्याचबरोबर 15 ते 20 किलो रांगोळीचा वापरही करण्यात आला आहे. गौरवला दोन वर्षांपासून रांगोळी काढायचे स्वप्न होते. या रांगोळीसाठी वीस किलोपेक्षा अधिक रांगोळी आणि रंग लागले आहेत. यात पिगमेंट व लेक रंगांचा मिश्रण केलेल्या रंगाच्या वापर केला आहे. या रासायनिक रंग रु.१२० चे १०० ग्रॅम स्वरूपात मिळाले. पाच हजारांपेक्षा अधिक खर्च या रांगोळीसाठी लागला आहे.
गौरवच्या रांगोळीला मिळाला प्रतिसाद
मालेगाव येथील साई आर्ट संस्थेचे संचालक, प्रमोद आर्वी यांच्या मार्गदर्शनात गौरव माळी या विद्यार्थ्याने प्रशिक्षण घेतले आहे. श्री गणरायाची 4×6 फुटाची रांगोळी प्रतिमा अदभुत असून ती डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे. अशी रांगोळी पहिल्यांदाच नंदुरबार येथे साकारण्यात आली आहे. नंदुरबार शहरातील गणपती मंदिरात गौरव माळी यांचे रांगोळी साकारली आहे.
हेही वाचा - सणासुदीतील बॉम्बस्फोटाचा उधळला डाव; 6 दहशतवाद्यांना दिल्लीत अटक